शहरं
Join us  
Trending Stories
1
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
2
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
3
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
4
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
5
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
6
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
7
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
8
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
9
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
10
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
11
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
12
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
13
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
14
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
15
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
16
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
17
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
18
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
19
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
20
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
Daily Top 2Weekly Top 5

उत्कर्ष मंच ठरतोय गरजूंना आधारवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2021 04:18 IST

जयसिंगपूर : उत्कर्ष परिसर विकास मंच, उपकार नगर व शिवार सामाजिक सेवा संस्थेच्यावतीने सामाजिक बांधिलकीतून मोफत जेवण देण्याचा उपक्रम ...

जयसिंगपूर : उत्कर्ष परिसर विकास मंच, उपकार नगर व शिवार सामाजिक सेवा संस्थेच्यावतीने सामाजिक बांधिलकीतून मोफत जेवण देण्याचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. गरीब व गरजू पन्नास लोकांना दररोज जेवण देण्यात येत आहे. उत्कर्ष मंचकडून राबविण्यात येणारा हा उपक्रम गरजूंना आधारवड ठरत आहे.

लॉकडाऊनमुळे काही गरीब, गरजू लोकांना मदतीचा हात म्हणून पन्नास लोकांना जेवण देण्याचा संकल्प सुरू केला आहे. येथील दहावी गल्ली येथे हा उपक्रम सुरू असतो. या उपक्रमाला चांगला प्रतिसाददेखील मिळत आहे. माजी खासदार राजू शेट्टी यांच्या हस्ते या उपक्रमास सुरुवात करण्यात आली. या उपक्रमासाठी ज्यांना मदतीचा ओघ देखील सुरू झाला आहे. ज्यांना मदत द्यायची आहे त्यांनी उत्तम सुतार, आबासाहेब जाधव यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन संस्थेच्यावतीने करण्यात आले आहे.

चौकट - उपक्रमास प्रतिसाद

उत्कर्ष परिसर विकास मंच व शिवार सामाजिक सेवा संस्थेच्यावतीने सुरू केलेल्या या उपक्रमासाठी आतापर्यंत १ लाख ४ हजार ४५२ इतकी रक्कम जमा झाली आहे. हा उपक्रम मोठ्या पध्दतीने सुरू ठेवण्यासाठी दातृत्वांनी मदतीसाठी पुढे यावे, असे आवाहन उत्कर्ष परिसर विकास मंचचे अध्यक्ष महावीर पवार यांनी केले आहे.

फोटो - ०२०५२०२१-जेएवाय-०२

फोटो ओळ - जयसिंगपूर येथे उत्कर्ष मंचच्यावतीने गरजू लोकांना मोफत जेवण पुरविण्याचा उपक्रम माजी खासदार राजू शेट्टी यांच्या हस्ते सुरू करण्यात आला.