शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

अकरावीसाठी ‘स्मार्ट’ प्रवेश ‘अ‍ॅप’चा वापर

By admin | Updated: June 14, 2016 23:58 IST

उद्यापासून शहरातील ३२ महाविद्यालयांसाठी केंद्रीय प्रवेश प्रक्रिया

कोल्हापूर : महाविद्यालयीन प्रवेशाचा पहिला टप्पा असलेल्या अकरावी प्र्रवेशाची प्रक्रिया उद्या, गुरुवारपासून सुरू होत असून, सलग २0 दिवस शहरातील ३२ महाविद्यालयांतील १३,४०० विद्यार्थी क्षमतेसाठी केंद्रीय पद्धतीने ही प्रक्रिया राबविली जाईल. प्रवेश प्रक्रिया व प्रवेश यादीची माहिती (‘ङ्म’ँंस्र४१ 11३ँ अे्रि२२्रङ्मल्ल) या मोबाईल अ‍ॅपवर उपलब्ध असणार आहे. प्रक्रियेचे मुख्य केंद्र यावर्षी राजाराम महाविद्यालय राहणार आहे. दहावीच्या टक्केवारीवर प्रवेशाची सूत्रे निश्चित केली असल्याने समितीकडून वाढीव प्रवेश क्षमतेचे नियोजन केले जाणार आहे. विद्यार्थ्यांना शिक्षण खात्याच्या (६६६.८िीि‘ङ्मस्र.ङ्म१ॅ)या संकेतस्थळावर प्रवेश प्रक्रिया, महाविद्यालयांची माहिती ठेवली असल्याचे शिक्षण उपसंचालक व प्रवेश प्रक्रिया समितीचे अध्यक्ष एम. के. गोंधळी यांनी सांगितले. शाळेचा आज पहिला दिवस कोल्हापूर : प्रभात फेरी, वाद्यांचा गजर आणि लोकप्रतिनिधींच्या प्रमुख उपस्थितीत आज, बुधवारी विद्यार्थ्यांचे स्वागत केले जाणार आहे. जिल्ह्यासह शहरातील शाळांच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचे आणि गणवेशाचे वाटप केले जाणार आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी सुभाष चौगुले यांनी दिली. विविध शाळांचा पहिला दिवस हा प्रवेशोत्सव म्हणून साजरा केला जाणार आहे. विद्यार्थ्यांचे स्वागत स्थानिक जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सरपंच, उपसरपंच, तसेच ज्येष्ठ सदस्यांच्या हस्ते केला जाईल. मोफत पाठ्यपुस्तके दिली जातील. शालेय पोषण आहारासह गोड खाऊ वाटप केला जाणार आहे. जिल्ह्यातील पहिली ते आठवीपर्यंच्या सुमारे पावणेचार लाख विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्या दिवशी पाठ्यपुस्तकांचे वितरण केले जाणार आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा विमल पाटील या खाटांगळे (ता. करवीर) येथील शाळेतील प्रवेशोत्सवासाठी प्रमुख उपस्थित राहणार आहेत. महानगरपालिकेच्या प्राथमिक शिक्षण मंडळाने नवोदितांच्या स्वागतासह प्रवेशोत्सवाची तयारी पूर्ण केली असल्याचे मंडळाच्या प्रभारी प्रशासनाधिकारी प्रतिभा सुर्वे यांनी सांगितले. दरम्यान, विनाअनुदानित शाळांना अनुदान देण्याचा शासकीय आदेश निघेपर्यंत आमचे आंदोलन सुरू राहील, असे कृती समितीचे राज्यउपाध्यक्ष खंडेराव जगदाळे यांनी सांगितले.