शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
4
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
5
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
6
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
7
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
8
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
9
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
10
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
11
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
12
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
13
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
14
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
15
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
16
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
17
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
18
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
19
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
20
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
Daily Top 2Weekly Top 5

सत्तेसाठी धर्माचा वापर चुकीचा

By admin | Updated: December 22, 2015 00:59 IST

कुमार सप्तर्षी : शहाजी महाविद्यालयात राज्यशास्त्र परिषदेच्या अधिवेशनाला प्रारंभ

कोल्हापूर : हिंदू धर्माच्या नावाखाली चार हजार संप्रदाय आहेत. आपल्या देशाच्या बोलीभाषेत धर्माला एकही ‘शब्द’ नाही. धर्माच्या नावाखाली विविध संप्रदाय लोकांच्या अज्ञानाचा गैरफायदा घेतात. सत्ता हस्तगत करण्यासाठी धर्माचा वापर करणे हे चुकीचे आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत डॉ. कुमार सप्तर्षी यांनी सोमवारी येथे केले.येथील शहाजी महाविद्यालय, शिवाजी विद्यापीठाचा राज्यशास्त्र विभाग आणि राज्यशास्त्र परिषदेतर्फे आयोजित राज्यस्तरीय अधिवेशनात डॉ. के. के. कावळेकर व्याख्यानमालेत ते बोलत होते. ‘हिंदू धर्म आणि हिंदुत्व’ हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय होता. अध्यक्षस्थानी डॉ. बाळासाहेब भोसले होते.सप्तर्षी म्हणाले, हिंदुत्व हे राजकीय सत्ताप्राप्तीचे साधन बनले आहे. मात्र, हिंदुत्वाचा हिंदू धर्माशी काही संबंध नाही. धर्माचे स्वरूप हे वैयक्तिक आहे. एक व्यक्ती एकापेक्षा अधिक धर्माचे आचरण करू शकते. आपल्या देशवासीयांमध्ये एकत्रित राहण्याची मोठी कला असून, यात ते निष्णात आहेत. जगभरातील अभ्यासकांसाठी आपला देश मोठी प्रयोगशाळा आहे. दरम्यान, या राज्यस्तरीय अधिवेशनाचे उद्घाटन जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश सुनील वेदपाठक यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी शाहू छत्रपती शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बी. के. पाटील होते. कार्यक्रमात प्रा. आर. आर. गायकवाड, विनायक पाटील यांचा सत्कार आणि ‘राजमुद्रा’ अंकाचे प्रकाशन उपस्थितांच्या हस्ते झाले. यावेळी अधिवेशनाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. दिनकर पाटील, राज्यशास्त्र विभागप्रमुख प्रा. भारती पाटील, नेहरू अभ्यास केंद्राच्या समन्वयक प्रा. वासंती रासम प्रमुख उपस्थित होत्या. डॉ. एच. एस. वनमोरे यांनी प्रास्ताविक तर प्रा. पी. के. पाटील यांनी सूत्रसंचालन केले. चांगल्या विचारांची गरजअणुबॉम्ब तयार करणे हे मतिमंदपणाचे लक्षण आहे. पाकिस्तानची केवळ चार मोठी शहर आहेत. मात्र, भारताची ८५ शहरे मोठी असून, त्यांना अणुबॉम्बचा धोका आहे. अणुबॉम्बपेक्षा चांगले विचार आणि ज्ञानाची आवश्यकता आहे, असे मत डॉ. सप्तर्षी यांनी व्यक्त केले.कायद्याचे ज्ञान आवश्यककायदा हा जीवनाचा अविभाज्य घटक आहे. प्रत्येक नागरिकाला कायद्याच्या ज्ञानाची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन कोल्हापूरचे जिल्हा व सत्र न्यायाधीश सुनील वेदपाठक यांनी केले. ते म्हणाले, महाविद्यालयीन शिक्षणात कायद्याचे ज्ञान देण्यात यावे. हे ज्ञान मिळाल्यास सक्षमपणे जीवन जगता येईल. ते लक्षात घेऊन प्रत्येकाने कायद्याचे ज्ञान संपादन करण्यासाठी प्रयत्नशील राहावे.