शहरं
Join us  
Trending Stories
1
२०१४ मध्येच भाजपा शिवसेनेला हात दाखवणार होती,पण...; प्रफुल्ल पटेलांचा १० वर्षांनी गौप्यस्फोट
2
Russia Ukrain War : डोनाल्ड ट्रम्प युक्रेनचे दोन तुकडे करणार? क्रिमिया अन् दोन मोठी शहरे रशियाला मिळणार
3
तरुण वयात ₹१०० ची बचत वृद्धापकाळात देऊ शकते ३ कोटींची रक्कम; SIP मध्ये गुंतवणुकीसाठी वापरू शकता 'हा' फॉर्म्युला
4
आभाळ फाटले! मुखेड तालुक्यातील सहा गावांत पाणी शिरले; बेपत्ता १२ जणांचा शोध सुरु
5
Mumbai Rain Alert: मुंबईत रेड अलर्ट; तीन ते चार तासात 'अतिमुसळधार' कोसळणार, शाळांना सुट्टी जाहीर
6
परळी हादरलं! लग्नावरून परतताना जीप पुरात वाहून गेली; तिघे बचावले, एकाचा मृत्यू
7
School Holiday: मुंबईत शाळांना सुट्टी जाहीर, पाणी साचल्याने अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प; ४८ तासांसाठी रेड अलर्ट जारी
8
Video: टोलनाक्यावरील कर्मचारी की गुंड; लष्कराच्या जवानावर तुटून पडले, खांबाला बांधून दांडक्याने मारले
9
चेकच्या मागच्या बाजूला सही का करतात? ९०% लोकांना या प्रश्नाचे उत्तर माहित नसणार
10
‘मत चोरी’चा वाद वाढला, विरोधक मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्याच्या तयारीत 
11
Technology: ATM मधून पैसे काढल्यानंतर तुमचा PIN सुरक्षित राहतो का? 'अशी' घ्या काळजी!
12
Asia Cup India Squad : गंभीरनं 'फिल्डिंग' लावली तर गिल खेळणार; नाहीतर... आगरकर हे ३ मोठे निर्णय घेणार?
13
धक्कादायक! रणथंभोर व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांची गाडी अचानक पडली बंद आणि मग...
14
श्रावणातला शेवटचा आठवडा; 'या' दिशेला लावा बेलाचे झाड, घरात धन, समृद्धी, पैसा येईल अपार
15
"सिनेमाच्या नावाखाली अभिनेते मजा..." कमी वयाच्या अभिनेत्रींसोबत काम करण्यावर आर माधवनचं भाष्य
16
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
17
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
18
भाडे देऊन लाखोंचे नुकसान की EMI देऊन घर खरेदी करावे? ५० लाखांच्या घराचं आर्थिक गणित समजून घ्या
19
फ्लॉप शोचा सिलसिला संपेना! अन् म्हणे; सलमानचा पाक संघ आशिया कपमध्ये टीम इंडियासमोर हिट ठरेल
20
Apple नं ट्रम्प आणि चीनला दाखवला ठेंगा; भारतात आणखी एका प्रकल्पातून सुरू केलं iPhone चं उत्पादन

गैरकृत्ये करून घेण्यासाठी ‘नार्कोटिक्स’चा वापर

By admin | Updated: September 10, 2016 00:42 IST

न्यायालयात माहिती : मोटारसायकलबद्दल तावडेने दिलेली माहिती खोटी

कोल्हापूर : ज्येष्ठ नेते नरेंद्र दाभोलकर व गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणातील संशयित आरोपी डॉ. वीरेंद्र तावडे याच्याकडे सनातन संस्थेच्या पनवेल आश्रमात नार्कोटिक औषधे मिळाली असून, गैरकृत्ये करून घेण्यासाठीच या औषधांचा वापर होत होता काय, याचा पोलिस शोध घेत असल्याची माहिती सरकार पक्षातर्फे गुरुवारी न्यायालयात दिली. तावडे याने आपली मोटारसायकल काकांच्या अपार्टमेंटमध्ये लावली होती व गॅरेजचालकाच्या मदतीने स्क्रॅप केल्याचे तपासात सांगितले आहे; परंतु या दोन्ही गोष्टी खोट्या असल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे.विशेष सरकारी वकील शिवाजी राणे यांनी न्यायालयात पोलिसांनी केलेल्या तपासाची माहिती दिली. पानसरे खून खटल्यातील दोन नंबरचा आरोपी डॉ. वीरेंद्र तावडे हा व्यवसायाने डॉक्टर असून त्याच्याकडे आश्रमातील वैद्यकीय विभागाची जबाबदारी होती. आश्रमाच्या झडतीवेळी त्या ठिकाणी मनुष्याच्या चेतासंस्थेवर परिणाम करणाऱ्या शेड्युल एच व एच-१ अशा प्रकारच्या ड्रग्जचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो, असे निदर्शनास आले असून, ही औषधे कोणाच्या सल्ल्याने अथवा कोणाला दिली जात होती? अथवा अशा पद्धतीची मनोव्यापाराशी निगडित औषधे देऊन साधकांना आपल्या नियंत्रणाखाली ठेवून त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारची गैरकायदेशीर कृत्ये करून घेणे हा हेतू आहे काय? याचा पोलिस शोध घेत असल्याची माहिती न्यायालयात देण्यात आली.दाभोलकर यांच्या खून प्रकरणाच्या तपासात तावडे याने माझ्याकडे काळ्या रंगाची (एमएच-०९ ३३४५) ही बजाज बॉक्सर कंपनीची मोटारसायकल होती, असे सांगितले होते. ती त्याने काही काळ त्याचे काका उज्ज्वल तावडे, रा. पुणे यांच्या अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये लावली होती व त्यानंतर चिंचवड-पुणे येथील मोटार सायकल गॅरेजचे मालक विष्णू साळुंखे यांच्याकरवी ती स्क्रॅप केल्याचे सांगितले. त्या नुसार पोलिसांनी उज्ज्वल तावडे यांच्याकडे चौकशी केली असता वीरेंद्र तावडे याची मोटारसायकल त्यांच्या पार्किंगमध्ये केव्हाही लावली नव्हती असे ते सांगत आहेत. गॅरेजमालक विष्णू साळुंखे, रा. चिंचवड पुणे यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी मे-जून २०१४ च्या दरम्यान तावडे माझ्या गॅरेजमध्ये तीन वेळा आल्याचे सांगितले. त्यापैकी एकवेळ त्यांनी मला मोटारसायकल व्यवस्थित चालत नसल्याचे सांगितल्याने तिचे स्पार्क प्लगची कॅप बदलून दिल्याचे मला आठवते. अर्थपुरवठा कोणी केला...तावडे याने पानसरे यांच्या हत्येचा कट रचण्यास केव्हा व कोठे सुरुवात केली, त्याचे साथीदार कोण, कटातील सहभागी साक्षीदारांना पिस्तूल चालविण्याचे प्रशिक्षण कोठे व कोणी दिले, गुन्ह्यासाठी वापरलेले पिस्तूल व त्यासाठी वापरलेली काडतुसे कोठून मिळवली व गुन्हा केल्यानंतर ती कोठे लपवली, प्रत्यक्ष गुन्हा करण्यासाठी कोणत्या वाहनांचा वापर केला, ती सध्या कुठे आहेत, गुन्ह्याचा कट केल्यापासून प्रत्यक्ष गुन्हा करण्यापर्यंत त्यांना अर्थपुरवठा केला याचा सखोल तपास करण्यात आला; परंतु तावडे हा शारीरिक आजाराची कारणे पुढे करून व आपणांस काही आठवत नाही, माहीत नाही असे सांगून तपासात सहकार्य करीत नसल्याचे सरकार पक्षाने न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.दंत महाविद्यालयात उपचार : आरोपी तावडे हा ४ नोव्हेंबर व १९ डिसेंबर २०१४ ला वारणानगर येथील तात्यासाहेब कोरे दंत महाविद्यालयात दातांवरील उपचारासाठी आला होता. या औषधोपचारासाठी तो वारंवार येत असल्याचे निष्पण्ण झाले आहे. परंतु पनवेल येथील एम.जी.एम. हॉस्पिटल येथे मोफत व अल्पदरात औषधोपचाराच्या सर्व सुविधा उपलब्ध असतानाही तावडे पनवेल ते कोल्हापूर या दूरच्या अंतरावर येऊन औषधोपचार घेण्याचे कारण काय याचा शोध पोलिस घेत आहेत. औषधोपचाराच्या बहाणा करून कोल्हापुरात येऊन गुन्ह्याच्या पूर्वनियोजनाबाबत व घटनास्थळाची पाहणी केली आहे काय याची चौकशी सुरू असल्याचे न्यायालयात सांगण्यात आले.पत्नीस चक्क तीर्थ म्हणून दिले सायकिअ‍ॅट्रिक औषधपोलिस कोठडीत असताना आरोपी तावडे व त्याच्या पत्नीची रुजवात घालण्यात आली. गोवा आश्रमात डॉ. आशा ठक्कर व तावडे याच्या पत्नीची भेट झाली होती. डॉ. ठक्कर यांनी तुमच्या पत्नीस सायकिअ‍ॅट्रिक औषधाची आवश्यकता असल्याचे तावडेला सांगितले. तेव्हा तावडे याने पत्नीस तिला न कळू देता साधिका सुदेशणा पिंपळे यांच्याकरवी तीर्थ म्हणून सायकिअ‍ॅट्रिक औषधाचा नियमित डोस दिल्याचे स्पष्ट झाले आहे.