शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
2
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
3
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
4
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
5
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
6
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
7
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
8
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
9
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
10
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
11
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
12
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
13
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
14
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"
15
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
16
“हेच मराठी, महाराष्ट्राचे मारेकरी, हिंदूंनाही वाचवू शकत नाही”; उद्धव ठाकरेंचा भाजपावर पलटवार
17
ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम थोडक्यात बचावला, फलंदाज ३६७ धावांवर नाबाद असताना घडलं असं काही...  
18
राहा फिट! वजन कमी करण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरतं 'पिरॅमिड वॉक'; पण 'ते' आहे तरी काय?
19
'पंचायत'च्या विनोदने 'या' मराठी अभिनेत्रीसोबतही केलंय काम, सिनेमाची आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा
20
…तेव्हा अवघ्या २ मतांनी पराभव, आता ४ वर्षांनी बदललं नशीब, पुनर्मतमोजणीत बाजी मारून बनल्या सरपंच  

सेवा नव्हे, मेवा खाण्यासाठीच महाडिकांकडून ‘गोकूळ’चा वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:32 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी सेवेसाठी नव्हे, तर मेवा खाण्यासाठीच ‘गोकूळ’चा वापर केल्याचा ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी सेवेसाठी नव्हे, तर मेवा खाण्यासाठीच ‘गोकूळ’चा वापर केल्याचा पलटवार ‘गोकूळ’च्या संचालिका अंजना रेडेकर, प्रकाश पाटील व बयाजी शेळके यांनी मंगळवारी केला.

‘गोकूळ’मध्ये चुकीचा कारभार केला असेल तर गुन्हे दाखल करा, असे आव्हान ‘गोकूळ’च्या संचालिका शौमिका महाडिक यांनी दिले होते. त्यावर, रेडेकर, पाटील व शेळके यांनी पत्रकातून पलटवार केला.

पत्रकात म्हटले, महाडिक यांनी गेली ३० वर्षे कोट्यवधी रुपये टँकर भाडे, दूध एजन्सी यामधून मिळवल्याचा आरोप आमच्या नेत्यांनी केले. या आरोपांबाबत कोणीही व्यक्ती आपण जे केले ती चूक होती, आपण दूध उत्पादकांच्या तोंडचा घास काढून घेतला, याबाबत शरम वाटून शांत बसली असती; परंतु तसे घडले नाही. उलट आम्ही सेवा करून पैसे मिळविले, अशा आशयाचे पत्रक काढले. याबाबत आश्चर्य वाटते. तुम्ही गोकूळ संस्थेचे प्रमुख सर्वेसर्वा असल्याने ४५ टँकर तुमचे होते. हे टँकर कार्यकर्त्यांना देऊन त्यांचे भले करता आले असते. इतर दूध संघांपेक्षा एका मुंबई खेपेला ७ हजार रुपये जादा भाडे तुम्ही घेतले. मुंबईची एजन्सी तुमचीच त्याचे कमिशन तुम्हालाच होते. दुधाची एजन्सी, बटर-लोणी याची विक्री तुम्हीच करत होता.

पहाटेपासून शेणामुतात राबणाऱ्या उत्पादकांच्या हातात दोन पैसे जादा देता आले असते. उलट आम्ही सेवा करून शेकडो कोटी रुपये बिल मिळविले असे म्हणता, यावरून तुमची व्यापारी प्रवृत्ती दिसते. कोणावर सूड उगवण्यासाठी आम्ही सत्तेवर आलेलो नाही, दूध उत्पादकांच्या घामाला योग्य भाव देण्यासाठी आमच्या नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असून, उत्पादकांच्या भल्यासाठी काही कठोर निर्णय घ्यावे लागले तरी ते घेऊच, असेही त्यांनी पत्रकात म्हटले आहे.

योग्य वेळी चौकशी आणि कारवाईही होईलच

तुमच्या कारभाराची योग्य वेळी चौकशी होईलच, कायद्याप्रमाणे चुकीच्या गोेष्टी झाल्या आहेत, त्यांच्यावर फौजदारीसह सर्व कारवाई होतीलच. ज्यांनी पाप केले, त्यांना प्रायश्चित्त घ्यावेच लागेल, असा इशाराही पत्रकातून दिला.

पंधरा कोटींची चर्चा

प्रत्येक पंधरा लाख रुपये घेऊन शंभर कर्मचाऱ्यांच्या भरतीचे १५ कोटी निवडणुकीसाठी गोळा केले. याची चर्चा जाहीरपणे लोक करत असल्याचेही पत्रकात म्हटले आहे.