शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

महाडिकांकडून सत्तेसाठी सर्व पक्षांचा वापर

By admin | Updated: October 26, 2015 00:48 IST

जयंत पाटील : देशभरात स्वबळावर लढणाऱ्या भाजपची कोल्हापुरात आघाडी का?

कोल्हापूर : नीतिमत्ता व तत्त्व नसलेल्या ‘ताराराणी’च्या नेतृत्वाने सत्तेसाठी दिसेल त्या पक्षाचा शिडीसारखा वापर केला आहे. सोयीचे राजकारण करणाऱ्या या सत्तेच्या दलालांना हद्दपार करा, अशा शब्दांत महादेवराव महाडिक यांचे नाव न घेता आमदार जयंत पाटील यांनी टीका केली. देशभरात स्वबळावर लढणाऱ्या भाजपचे कोल्हापुरात का धाडस झाले नाही? असा सवालही त्यांनी यावेळी केला.राष्ट्रवादीचे उमेदवार अजिंक्य चव्हाण, सुनीता पन्हाळकर, रामेश्वर पत्की, महेश सावंत, अर्चना साळोखे, दिलीप माने यांच्या प्रचारार्थ शिवाजी पेठेत आयोजित सभेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी अशोकराव जाधव होते. जयंत पाटील म्हणाले, गेल्या पाच वर्षांत विकास काय असतो, हे राष्ट्रवादी कॉँग्रेसने दाखवून दिले आहे. रस्ते, पाणी, गटारी या मूलभूत सुविधा पूर्ण केल्याच; पण त्याबरोबरच थेट पाईपलाईन, केशवराव भोसले नाट्यगृह, आदी महत्त्वाच्या बाबींसाठी कोट्यवधी रुपये दिले. याउलट सत्तेवर आल्यानंतर महिन्यात कोल्हापूरचा टोल हद्दपार करतो म्हणणाऱ्यांनी काय केले? चंद्रकांतदादा पाटील हे बांधकाममंत्री असताना ते का निर्णय घेत नाहीत? यामागे काहीतरी गौडबंगाल असून मुख्यमंत्री व वित्तमंत्री यांचा पश्चिम महाराष्ट्राबाबतचा द्वेष यातून स्पष्ट होतो. शिवसेनेवर जोरदार टीका करीत, बाळासाहेब ठाकरेंनी अपमान झाला असता तर सत्तेला लाथ मारली असती; पण उद्धव ठाकरे मानहानी पत्करून सत्तेला चिकटून राहिल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले. कॉँग्रेसमध्ये सरकारविरोधी काम करण्याची क्षमता नसल्याने केवळ राष्ट्रवादी कॉँग्रेसच सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरू शकते, याची जाणीव भाजप सरकारला झाल्याने ते राष्ट्रवादीच्या नेत्यांवर खोटे आरोप करीत आहेत. पण एकदा चौकशी होऊ दे. त्यातून सत्य जनतेसमोर येईल, असेही पाटील यांनी यावेळी सांगितले. प्रा. जयंत पाटील, माजी महापौर सुनीता राऊत, अजिंक्य चव्हाण, महेश सावंत, रामेश्वर पत्की, सुरेश गायकवाड, अ‍ॅड. अशोकराव साळोखे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी व्ही. बी. पाटील, चंद्रकांत सूर्यवंशी, भैया माने, परीक्षित पन्हाळकर, अजित राऊत, आदी उपस्थित होते. दरम्यान, सुर्वेनगर, साळोखेनगर येथेही जयंत पाटील यांनी प्रचार सभा घेतली. दादांनी उड्या मारू नयेतटोलमुक्त कोल्हापूर करण्यासाठी चारशे ते पाचशे कोटी देण्याची दानत भाजप सरकारमध्ये नाही. त्यामुळे चंद्रकांतदादा पाटील यांनी जास्त उड्या मारू नयेत, असा टोला जयंत पाटील यांनी हाणला.