शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

डॉल्बीसाठी आमदार क्षीरसागर यांचाच आग्रह

By admin | Updated: September 6, 2016 01:32 IST

राजारामपुरीत तणाव : दीड तास मिरवणूक खोळंबली, तासभराच्या बैठकीनंतर दोन टॉप व दोन बेसला परवानगी

कोल्हापूर : महिन्याभरापासून जिल्हा पोलिस प्रशासन व लोकप्रतिनिधीही ‘नो डॉल्बी’साठी झटत असताना सोमवारी राजारामपुरी परिसरातील काही मंडळांसाठी आमदार राजेश क्षीरसागर यांना मध्यस्थी करून ध्वनी मर्यादेच्या नियमाला अधीन राहून डॉल्बी लावण्यासाठी परवानगी द्या, असा आग्रह धरला. त्यामुळे सोमवारी गणेश आगमनावेळी राजारामपुरीत काही गणेश मंडळाचे डॉल्बी वाजले; पण ते नियमात राहून.महिन्याभरापासून डॉल्बीमुक्त गणेशोत्सव साजरा करा, अशी हाक प्रशासनाने गणेश तरुण मंडळांना दिली आहे. याला बहुतांश: गणेश तरुण मंडळांनी ‘नो डॉल्बी’चा नारा देत पोलिस ठाण्यांना पत्रे दिली आहेत. सोमवारी राजारामपुरी परिसरातील काही मंडळांना दोन टॉप, दोन बेसपेक्षा जास्त ध्वनींची सिस्टीम लावण्यास राजारामपुरी पोलिसांनी विरोध केला. त्यामुळे राजारामपुरी जनता बझार चौकात दुपारी साडेचारंपासून सायंकाळी पावणेसहा वाजेपर्यंत वातावरण तणावपूर्ण होते. दरम्यान, राजारामपुरी विभागीय कार्यालयातील तळमजल्यावर आमदार क्षीरसागर व काही निवडक पदाधिकारी, पोलिस अधिकारी यांची बैठक झाली. सुमारे तासानंतर ही बैठक झाल्यानंतर दोन टॉप व दोन बेसला पोलिसांनी परवानगी दिली. पण, कोणत्याही ध्वनिप्रदूषण कायद्याचा भंग करणार नाही, असे बैठकीत सांगितले असल्याचे क्षीरसागर यांनी सांगितले. बैठक झाल्यानंतर क्षीरसागर हे बाहेर आल्यानंतर कार्यकर्त्यांनी चौकात एकच जल्लोष केला. क्षीरसागर यांच्या नावाचा घोष केला. त्यानंतर सायंकाळी पावणेसहा वाजता मुख्य मिरवणुकीला सुरुवात झाली.नेत्यांची परवानगी : क्षीरसागर यांचा पोलिस अधिकाऱ्यांकडे आग्रहया मंडळांचा डॉल्बीला फाटाराजारामपुरी मुख्य रस्त्यावर सोमवारी सायंकाळी विश्वशांती तरुण मंडळ, इंगळे माळ (झांज पथक), जय बजरंग तालीम मंडळ (ढोलताशा पथक), राजारामपुरी स्पोर्टस् (छोटी स्टेरिओ सिस्टीम),जीटीएम (ढोलताशा), हनुमान तालीम मंडळ (ढोलताशा), जिद्द युवक संघटना (सावंतवाडी येथील विठ्ठल तरुण मंडळाचे ढोलताशा पथक), शाहूनगर मित्रमंडळ, चार्लिज स्पोर्टस्, सम्राट फ्रेंडस् सर्कल, ( ढोलताशा), शिवप्रेमी (जयप्रभा बेंजो पथक), वेलकम गु्रप (स्पेशल लाईट इफेक्ट), सिद्धिविनायक मित्र मंडळ (मुंबईतील कलाकारांचा नृत्याविष्कार) आदी मंडळांचा समावेश होता.वातावरण तंग दुपारी साडेचार वाजल्यापासून काही मंडळे राजारामपुरी उद्यानाजवळ जमत होती. काही मंडळांनी बेस जोडण्याची तयारी केली होती. मात्र, पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत डॉल्बी बेस लावता येणार नसल्याचे स्पष्ट केले. त्यावरून काही मंडळांनी मिरवणूक थांबविण्याचा निर्णय घेतला. हजारोच्या संख्येने जमलेल्या गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली. स्टेरिओ सिस्टीम न लावू दिल्याने वातावरण काहीकाळ तंग राहिले. ही बाब आमदार राजेश क्षीरसागर यांना फोनवरून कल्पना दिल्यानंतर ते स्वत: तेथे आले, त्यांनी बैठक घेत शांतता राखण्याचे आवाहन केले. फेटा बांधून स्वागत...राजारामपुरीतील मुख्य रस्त्यावरून जाणाऱ्या गणेश तरुण मंडळांचे स्वागत शिवसेना राजारामपुरी शाखेतर्फे भगवे फेटे बांधून करण्यात आले. आमदार राजेश क्षीरसागर यांना मानणाऱ्या पदाधिकाऱ्यांनी तिसऱ्या गल्लीजवळ स्वागत मंडप उभा केला.स्पेशल इफेक्टचा ‘फिल’ राजारामपुरी येथील काही मंडळांच्या मिरवणुकीसमोर ‘सैराट’, ‘जयभवानी’, ‘डॉन’, ‘शांताबाई’, आदी रिमिक्स गाण्यांवर तरुणाई बेभान होऊन नाचत होती. प्रखर लाईट इफेक्ट, स्मोक युनिटच्या वापरामुळे मिरवणूक पाहण्यास आलेल्या नागरिकांचे डोळे अक्षरश: दीपत होते. त्यामुळे पुढे चालताना काही जणांना ठेचा लागत होत्या. काही मंडळांनी आपल्या नावाचे लेसर किरण तयार केले होते. हे किरण हवेत दिसत होते. यासह अनेक मंडळांनी स्क्रीन लावल्या होत्या. त्यामुळे अक्षरश: मेन रोडवर ‘फिल्मी स्टाईल’चा फिल आला होता. व्ही गु्रप, राजारामपुरी तालीम, शहीद भगतसिंग तरुण मंडळ या मंडळांनी स्पेशल लाईट इफेक्टसह स्क्रीन व छोट्या साऊंड सिस्टीमचा वापर केला. या मंडळांचा आवाजाची मर्यादा जरा वाढलीच होती. या मंडळांची मिरवणूक राजारामपुरी उद्यानाजवळ बराच वेळ होती. त्या ठिकाणाहून या मिरवणुका किमान दोन तासांपेक्षा अधिक काळ तेथेच होत्या. युवकांचा मोठा जमाव या मंडळांसमोर नाचत होता.