शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

युरिया अडीचशेचा; लिंकिंग साडेसातशेचे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2019 00:00 IST

कोपार्डे : रब्बी हंगामासह ऊस लावणीची भरणी, खोडवा यासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांतून युरियाची मोठी मागणी आहे. मात्र, अनेक ठिकाणी युरियाची ...

कोपार्डे : रब्बी हंगामासह ऊस लावणीची भरणी, खोडवा यासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांतून युरियाची मोठी मागणी आहे. मात्र, अनेक ठिकाणी युरियाची टंचाई दाखवत दोनशे पासस्ट युरियाच्या पोत्यांवर तब्बल साडेसातशे ते आठशे रुपयांच्या इतर सेंद्रिय खतांच्या पिशव्या गळ््यात मारून शेतकºयांची आर्थिक लूट होत आहे.युरिया वगळता सर्वच रासायनिक खते नियंत्रणमुक्तकेल्याने बहुतेक रासायनिक खतांचे दर गगनाला भिडले आहेत. यात होणारी वाढ शेतकºयांच्या आवाक्याबाहेर जात असताना शासनाला मात्र या खतांच्या किमती नियंत्रणात ठेवता येत नसल्याने शेतकºयांना मोठा आर्थिक ताण सहन करावा लागत आहे. यावर पर्याय म्हणून शेतकरी युरिया खताला सर्वाधिक पसंती देत आहे. परिणामी जिल्ह्यातील शेतकºयांकडून रब्बी हंगामात पिकाला खत देण्यासाठी युरिया खताची मागणी वाढली आहे. शेतकºयांकडून युरिया खतांच्या होणाºया मागणीचा व युरियाच्या तुटवड्याचा फायदा उठवत खत कंपन्यांनी युरियाचे पोते पाहिजे असेल तर यावर रासायनिक खतांची २० व २५ किलोंची पिशवी देण्यास सुरुवात केली आहे. या पिशवीची किंमत साडेसातशे ते आठशे रुपये असून, तीनशे रुपयांच्या युरियाच्या पिशवीला आठशे रुपयांची सेंद्रिय खताची पिशवी घ्यावीच लागत असल्याने शेतकरी आर्थिकदृष्ट्या मेटाकुटीस आला आहे.कोल्हापूर जिल्ह्यात गहू, सूर्यफूल, भुईमूग या रब्बी पिकाबरोबर ऊसपिकाखाली सव्वादोन लाख हेक्टर क्षेत्र आहे. सिंचनाची चांगली सोय असल्याने भाजीपाला व अन्य आर्थिक पिकाकडे शेतकरी वळला आहे; पण रासायनिक खतांचे वाढलेले दर व स्वस्त असणारा युरिया पिकाला वापरावा म्हटले तरी लिंकिंगद्वारे होणारी आर्थिक लूट पाहता शेतकºयांचे अर्थकारण दिवसेंदिवस बिघडत चालले आहे.इफ्को व कृभको या दोन कंपन्यांच परदेशातून युरिया खरेदी करतात. गेल्या चार वर्षांत या कंपन्यांकडून युरिया दर नियंत्रणात असल्याने निम्म्यावर आयात आणली आहे. यामुळे ऐन हंगामात युरियाची कृत्रिम टंचाई निर्माण करून शेतकºयांवर लिंकिंग लादायला सुरुवात केली आहे.गेल्या चार वर्षांत देशात आयात युरिया व त्याचा खर्चवर्षे आयात मे. टन खर्च दशलक्ष रु.२०१५/१६ ८४.७३ २,०८७२०१६/१७ ५४.८१ १,०४७२०१७/१८ ५९.७५ १,२९५२०१८/१९ ४२.०३ १,०४८