शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

वजनाच्या आडून युरिया अनुदानाला कात्रीचा डाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2018 00:30 IST

राजाराम लोंढे ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : केंद्र सरकारने हळूहळू खतावरील अनुदान बंद करण्याचा घाट घातला असून, उरल्यासुरल्या युरिया खताच्या पिशवीचे वजन कमी करण्याचे आदेश कंपन्यांना दिले आहेत. खताचा डोस देण्याचा शेतकऱ्यांचा हिशोब वजनाऐवजी पोत्यावर आहे, त्यानुसार प्रत्येक पोत्यात पाच किलो खत कमी करून त्यातून अनुदानावरील खर्च कमी करण्याची सरकारची मखलाशी ...

राजाराम लोंढे ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : केंद्र सरकारने हळूहळू खतावरील अनुदान बंद करण्याचा घाट घातला असून, उरल्यासुरल्या युरिया खताच्या पिशवीचे वजन कमी करण्याचे आदेश कंपन्यांना दिले आहेत. खताचा डोस देण्याचा शेतकऱ्यांचा हिशोब वजनाऐवजी पोत्यावर आहे, त्यानुसार प्रत्येक पोत्यात पाच किलो खत कमी करून त्यातून अनुदानावरील खर्च कमी करण्याची सरकारची मखलाशी आहे. त्यानुसार सध्या बाजारात५० ऐवजी ४५ किलोंची युरियाची पोती उपलब्ध आहेत.सात-आठ वर्षांपूर्वी केंद्र सरकार सर्वच रासायनिक खतांना अनुदान देत होते; त्यामुळे खतांचे दर शेतकºयांच्या आवाक्यात होते; पण खतांच्या अनुदानावर जादा खर्च होत असल्याचे सांगत केंद्र सरकारने हळूहळू खतांवरील अनुदान कमी करत आणले. मध्यंतरी युरिया वगळता सर्वच खते नियंत्रणमुक्त केली. परिणामी, खत कंपन्यांची मनमानी सुरू झाली आणि आज बहुतांशी खतांच्या किमती ११०० ते १२०० रुपये पोते (५० किलो) आहे. सगळ्यात स्वस्त खत युरिया आहे, २६५ ते २८० रुपयांपर्यंत पोत्याचा दर आहे. त्यातही विक्रेत्यांच्या मार्जिनमुळे शेतकºयांना ३०० ते ३१० रुपयांना पदरात पडतो. तरीही इतर खतांच्या तुलनेत युरियाचे खत तसे आवाक्यात आहे; पण सरकारला युरियावरील अनुदान कमी करायचे आहे; पण त्यांनी पळवाटा शोधल्या आहेत. शेतकरी कितीही प्रगत असला तरी रासायनिक खतांचा डोस पोत्यावरच देतो. सल्लागार कंपन्याही शेतकºयांना एकरी पोत्यावरच हिशेब सांगत असतात. त्यामुळे पाच, दहा, चाळीस किलोत कोणी खताचा डोस देत नाही.युरियाचा वापर शेतकºयांनी कमी करावा, यासाठी सरकार गेले अनेक वर्षे प्रयत्न करीत आहे; पण शेतकºयांच्या आवाक्यात असल्याने इतर खतांऐवजी युरियालाच अधिक पसंती राहते. थेट अनुदान कमी करता येत नाही; त्यामुळे पोत्याचे वजन कमी करायचे, त्यातून शेतकºयांचा वापर कमी होईल. एखादा शेतकरी दहा पोती युरिया वापरत असेल तर प्रत्येक पोत्यामागे पाच किलो युरिया कमी झाल्यास आपोआपच अनुदानाचा वापरही कमी होईल, असा सरकारचा प्रयत्न आहे.युरियाही नियंत्रणमुक्त करण्याच्या हालचालीयुरिया हे एकमेव खत शेतकºयांच्या आवाक्यात आहे. तेही नियंत्रणमुक्त करून पूर्णपणे अनुदानमुक्त करण्याच्या हालचाली गतिमान झाल्या असून, त्याची सुरुवात वजनातून अनुदान कमी करण्याचा प्रयत्न असल्याचे शेतकºयांचे मत आहे.