इचलकरंजी : जागतिक स्तरावर एक मृदू आणि गोड भाषा म्हणून उर्दू भाषेचा उल्लेख होतो. भारतीय संस्कृतीमध्येसुद्धा उर्दू भाषेला मोठे महत्त्व आहे, असे उद्गार आमदार सुरेश हाळवणकर यांनी काढले.राज्य उर्दू शिक्षक संघटना आणि तालुका पंचायत समिती उर्दू केंद्र यांच्यावतीने तालुकास्तरावरील विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक स्पर्धा इचलकरंजीतील कल्याण केंद्र येथे घेण्यात आल्या. त्यावेळी आमदार हाळवणकर बोलत होते. सुरुवातीला इम्तियाज म्हैशाळे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. यावेळी गटशिक्षण अधिकारी भास्करराव बाबर, औद्योगिक वसाहतीचे अध्यक्ष राहुल खंजिरे, शिक्षण मंडळाचे अध्यक्ष तौफिक मुजावर, जिल्हा परिषद सदस्य विजया पाटील, पंचायत समिती सदस्य रेश्मा सनदी, केंद्रप्रमुख रेहाना पटेल, उर्दू शिक्षक संघटनेचे तालुका अध्यक्ष जाहीद पटेल, शहानूर कमालशहा, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
भारतीय संस्कृतीमध्ये उर्दू भाषेला मोठे महत्त्व
By admin | Updated: December 2, 2014 23:16 IST