शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
3
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
4
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
5
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
6
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
7
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
8
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
9
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
10
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
11
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
12
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
13
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
14
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
15
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
16
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
17
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
18
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
19
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
20
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
Daily Top 2Weekly Top 5

आरक्षण मिळेपर्यंत मराठा समाजाला ‘ओबीसी’ प्रवर्गाप्रमाणे सुविधा द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 04:26 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : मराठा समाजाला घटनात्मकरीत्या टिकणारे आरक्षण राज्य आणि केंद्र शासनाने द्यावे. हे आरक्षण मिळेपर्यंत ओबीसी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : मराठा समाजाला घटनात्मकरीत्या टिकणारे आरक्षण राज्य आणि केंद्र शासनाने द्यावे. हे आरक्षण मिळेपर्यंत ओबीसी प्रवर्गाप्रमाणे मराठा समाजाला नोकरी, शिक्षणामध्ये सुविधा द्याव्यात. त्याबाबतचा निर्णय राज्य सरकारने त्वरित एक-दोन दिवसांमध्ये घ्यावा. कोरोनामुळे सध्या आरक्षण आणि विविध मागण्यांसाठी आम्ही शांततेने पाठपुरावा करणार आहोत. त्याबाबतची आचारसंहिता निश्चित केली असून, त्यानुसार पुन्हा लढा दिला जाणार असल्याचे कोल्हापुरातील सकल मराठा समाजाचे समन्वयक वसंतराव मुळीक, दिलीप देसाई, इंद्रजित सावंत यांनी बुधवारी येथे पत्रकार परिषदेत सांगितले.

मराठा समाजाला आता घटनात्मक आरक्षण मिळावे, ही आमची प्रमुख मागणी आहे. ती पूर्ण करण्यासाठी राज्य सरकारने केंद्र सरकारकडे पाठपुरावा करावा. केंद्र सरकारने प्रसंगी घटनेत बदल करावा. आरक्षण रद्द झाल्याने मराठा समाजातून तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. सरकारने मागण्यांच्या मान्यतेबाबत लवकर सकारात्मक कार्यवाही करावी, अशी मागणी वसंतराव मुळीक यांनी केली. घटनात्मक आरक्षणासाठी राज्य सरकारने कॅॅबिनेटचा ठराव करून तो केंद्र सरकारकडे पाठवावा. त्याबाबत सकल मराठा समाज पाठपुरावा करेल. त्यादृष्टीने आरक्षणासाठीच्या राज्यभरातील लढ्याचा केंद्रबिंदू कोल्हापूर राहणार आहे. या लढ्याची आचारसंहिता निश्चित केली असल्याचे दिलीप देसाई यांनी सांगितले. आरक्षण मिळालेच पाहिजे, ते मिळेपर्यंत ओबीसी प्रवर्गाप्रमाणे मराठा समाजाला राज्य सरकारने सुविधा द्याव्यात. सारथी संस्था सक्षमीकरण, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाकडून कर्जपुरवठा आदी मागण्यांची पूर्तता करणे सरकारच्या हातात असून, त्याबाबत त्वरित निर्णय घ्यावा. आरक्षणासह विविध मागण्यांसाठीचा लढा सकल मराठा समाजाने बुधवारपासून शांततेच्या मार्गाने पुन्हा सुरू केला असल्याचे इंद्रजित सावंत यांनी सांगितले. यावेळी गुलाबराव घोरपडे, दिलीप सावंत, हर्षेल सुर्वे, शशिकांत पाटील, उत्तम जाधव, अवधूत पाटील उपस्थित होते.

--------------------------------------

अन्य मागण्या अशा

-सारथी संस्थेच्या विस्तारीकरणासह तिचे सक्षमीकरण करावे.

-अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या कर्जवितरणामध्ये सुलभता आणावी.

-मराठा समाजातील विद्यार्थ्यांची शैक्षणिक शुल्क रचना ‘ओबीसी’ समाजाच्या विद्यार्थ्यांप्रमाणे करावी.

-मराठा आरक्षणातून ज्यांची सरकारी नोकरीमध्ये निवड झाली आहे त्यांना ताबडतोब रुजू करण्यात यावे.

-----------------------------

मराठा आरक्षणाच्या लढ्याला शाहू छत्रपतींचे पाठबळ

मराठा आरक्षणासाठी दिल्लीपर्यंत लढा द्यावा लागणार आहे, त्यासाठी मी तुमच्यासोबत आहे. माझे सर्वतोपरी पाठबळ राहील, असे शाहू छत्रपतींनी सांगितले असल्याची माहिती इंद्रजित सावंत यांनी दिली.