शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

‘दौलत’बाबत अस्वस्थता

By admin | Updated: April 17, 2015 00:16 IST

भवितव्य अधांतरी : स्थानिक नेते गुंतलेत गोकुळ, जिल्हा बँकेच्या निवडणुकीत

नंदकुमार ढेरे - चंदगड - २० एप्रिलचा दिवस जसजसा जवळ येत चालला आहे. तसतसे चंदगड तालुक्यातील शेतकऱ्यांच्या काळजांचे ठोके वाढत चालले आहेत. थेटे पेपर्स प्रा.लि.,चा अडथळा दूर झाल्याने दौलत साखर कारखाना चालविण्यास देण्याबाबतची निविदा जिल्हा मध्यवर्ती बँकेने प्रसिद्ध केली आहे. त्यानुसार १७ एप्रिल ही कोरी निविदा फॉर्म स्वीकारण्याची अंतिम तारीख आहे, तर टेंडर फ ॉर्म सादर करण्याची अंतिम तारीख २० एप्रिल आहे.या तारखेपर्यंत कोणतीच सक्षम कंपनी किंवा संस्था पुढे न आल्यास काय घडेल? बँक आपला परवाना वाचविण्यासाठी थेट दौलतचा लिलाव पुकारेल. राज्याचे सहकारमंत्री चंद्रकांतदादा पाटील हे तर दौलतच्या विक्रीचीच भाषा करीत आहेत. कोणीच पुढे आले नाही, तर तालुक्यातील शेतकरी, कामगार, वाहतूक, कंत्राटदार, आदींनी एकत्र येऊन विविध मार्गांनी पैसे जमा करायचे आणि सहकारातच दौलत चालवायचा, अशी महत्त्वाकांक्षी योजना दौलत वाचविण्यासाठी धडपडणाऱ्या भल्या माणसांनी जाहीर केली आहे. परंतु, ती प्रत्यक्षात येईल की स्वप्नरंजन ठरेल, हे सांगता येत नाही. मोठ्या प्रमाणावर पैसे जमा करण्यासाठी वेळही खूप लागेल; पण बँका आता फार काळ थांबणार नाहीत असेच चित्र आहे. त्यामुळे कोणीच टेंडर भरले नाही म्हणून लिलाव अटळ असल्याचे दाखवून बँक ‘दौलत’ची विक्री करेल. त्यातून दौलतवरील कर्जाच्या मुद्दल रकमांची फेड होऊ शकेल. बँक ते सहनही करील. पण, शेतकरी, कामगार पगार आणि व्यापारी देण्यांचे काय? सध्या गोकुळ व जिल्हा बँकेच्या निवडणुकांची धामधूम सुरू आहे. सर्वच बडे नेते त्यामध्ये अडकून पडले आहेत. त्यांना सत्ता कशी मिळवता येईल, याची काळजी लागून राहिली आहे. दुसरा कोणताच विचार करायला त्यांना वेळ नाही, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे दौलतबाबत ते अवाक्षरही बोलण्यास तयार नाहीत. मालमत्ता जप्त कराव्यातदौलतवर जो कर्ज व देणी यांचा प्रचंड मोठा बोजा निर्माण झाला. शेकडो कोटी रुपयांचा तोटा झाला. त्याबाबतचे लेखापरीक्षण होऊन जबाबदाऱ्या निश्चित कराव्यात, जबाबदार व्यक्तींच्या मालमत्ता जप्त कराव्यात. त्यातून प्रथम कर्जे व देणी फेडावित, असे लोक आता उघडपणे बोलू लागले आहेत. जोपर्यंत लेखापरीक्षण होत नाही, जबाबदाऱ्या निश्चित होत नाहीत आणि संबंधितांकडून वसुली होत नाही. तोपर्यंत दौलतचा लिलाव होऊ नये, अशी जनतेची मागणी आहे. त्यातल्या त्यात आशादाई बाब म्हणून माजी राज्यमंत्री सतेज पाटील यांनी दौलत भाडेतत्त्वावर चालवण्याची तयारी दर्शविली आहे. तर दौलत कारखाना सहकारातच राहावा, त्याचा लिलाव होऊ नये, अशी भावना तालुक्यात आता जोर धरू लागली आहे.