शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
4
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
5
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
6
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
7
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
8
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
9
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
10
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
11
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
12
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
13
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
14
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
15
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
18
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
19
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
20
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
Daily Top 2Weekly Top 5

जयप्रभा स्टडिओ परिसरात विनापरवाना बांधकाम

By admin | Updated: September 21, 2014 00:51 IST

महापालिकेची तक्रार : बिल्डर विकेश ओसवाल यांच्यावर गुन्हा

कोल्हापूर : मंगळवार पेठ, बेलबाग परिसरातील जयप्रभा स्टडिओच्या जागेतील इमारतीमध्ये विनापरवाना बांधकाम करून भोगवटा प्रमाणपत्र न घेता वापर सुरू केल्याने बिल्डर विकेश अभयकुमार ओसवाल (रा. बी वॉर्ड, मंगळवार पेठ) यांच्याविरोधात आज, शनिवारी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी महापालिकेच्या कनिष्ठ अभियंता प्रिया सुरेश पाटील (४०, रा. गुरुमहाराज नगरी, ध्यानचंद हॉकी स्टेडियमजवळ) यांनी फिर्याद दिली. या प्रकरणात गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा कोणताही संबंध नसल्याचे पोलीस निरीक्षक दिनकर मोहिते यांनी सांगितले. पोलिसांनी सांगितले, जयप्रभा स्टडिओची एकूण जागा सुमारे नऊ एकर होती. त्यातील सहा एकर जागा मालक लता मंगेशकर यांनी सहा वर्षांपूर्वी वटमुखत्यारद्वारे विकेश ओसवाल यांना दिली. जागेचे सर्वाधिकार ओसवाल यांना असल्याने त्यांनी या जागेत इमारती बांधण्यास सुरुवात केली. त्यांनी बांधलेल्या इमारतीमध्ये पालिकेच्या नगररचना विभागाची कायदेशीर परवानगी न घेता विनापरवाना बांधकाम सुरू केले. तसेच वापरात बदल करून भोगवटा प्रमाणपत्र न घेता वापर सुरू केला. हा प्रकार पालिकेच्या निदर्शनास येताच कनिष्ठ अभियंता श्रीमती पाटील यांनी बिल्डर ओसवाल यांच्याविरोधात फिर्याद दिली. पोलिसांनी महाराष्ट्र प्रादेशिक नगररचना अधिनियम १९६६ अनुसार गुन्हा दाखल केला. (प्रतिनिधी)