शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

विद्यापीठाच्या मंद संकेतस्थळाने अडचणी वाढल्या

By admin | Updated: July 28, 2016 00:50 IST

हजारो विद्यार्थी अडकले : पदवीच्या पहिल्या घासाला गोंधळाचा खडा

अविनाश कोळी -- सांगली -मंदगतीने चालणाऱ्या...कधी-कधी बंद पडणाऱ्या शिवाजी विद्यापीठाच्या आॅनलाईन अर्जांच्या संकेतस्थळाने निर्माण केलेल्या गोंधळाने पदवीच्या पहिल्याच घासाला विद्यार्थ्यांना खडा लागला आहे. कोल्हापूर, सातारा, सांगली येथील महाविद्यालयांमध्ये कागदोपत्री प्रवेश पूर्ण झालेल्या कला, वाणिज्य, विज्ञान, संगणक यासह अन्य विषयांच्या पदवीच्या पहिल्या वर्षाच्या विद्यार्थ्यांना आॅनलाईन प्रवेश, पात्रता अर्ज भरण्याचे आदेश दिले आहेत, मात्र संकेतस्थळच मंदगतीने चालत असल्याने तिन्ही जिल्ह्यात हजारो विद्यार्थी प्रवेशापासून अद्याप वंचित राहिले आहेत. यापूर्वी महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेड (एमकेसीएल) मार्फत प्रवेश, पात्रता आणि परीक्षा अर्ज आॅनलाईन भरून दिले जायचे. यावर्षी शिवाजी विद्यापीठाने स्वत:च्या संकेतस्थळाद्वारे ही प्रक्रिया सुरू केली. वास्तविक प्रवेशाची महाविद्यालयीन स्तरावर प्रक्रिया पूर्ण झाली होती. विद्यार्थ्यांनी रितसर फी भरून प्रवेश घेतला होता. तरीही १५ जुलै रोजी उशिरा आॅनलाईन अर्जाबाबतचे आदेश विद्यापीठाने दिले. त्यानंतर तिन्ही जिल्ह्यांमध्ये यासंदर्भातील प्रशिक्षण कार्यशाळाही पार पडल्या. प्रत्यक्षात गोंधळ सुरू झाला तो संकेतस्थळाच्या मंदगती कारभाराने. तिन्ही जिल्ह्यांतील विद्यार्थ्यांच्या संख्येचा विचार करून संकेतस्थळ तितके गतिमान करण्याची गरज होती. प्रत्यक्षात या संकेतस्थळाला गतीच नसल्याने प्रवेशाचे आॅनलाईन अर्ज रेंगाळले. तिन्ही जिल्ह्यांतील बहुतांश नेट कॅफेमध्ये हजारो अर्जांचे ढीग साचले. दिवसातून दोन अर्ज भरण्याइतकीही गती संकेतस्थळाला नाही. पात्रता अर्जांची अंतिम मुदत आता ३० जुलैपर्यंत वाढविली आहे. इतक्या कमी कालावधित हजारो विद्यार्थ्यांच्या आॅनलाईन प्रवेशाची प्रक्रिया पूर्ण होणे कठीण आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांसमोरील तसेच पर्यायाने महाविद्यालयांच्याही अडचणी वाढल्या आहेत. सांगलीतील प्रथम वर्ष पदवीसाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्यांनी या कारभाराबद्दल संताप व्यक्त केला आहे. मध्यरात्रीपर्यंत नेट कॅफेची सेवासांगलीच्या महाविद्यालयीन परिसरातील बहुतांश नेट कॅफेत हजारो अर्जांचे ढीग साचले आहेत. दिवसभर सुरू असणारे नेट कॅफे आता आॅनलाईन अर्जांच्या गर्दीमुळे मध्यरात्रीपर्यंत तसेच पहाटेपर्यंत सुरू आहेत. विद्यार्थ्यांना भुर्दंडआटापिटा करून प्रवेश मिळविलेल्या विद्यार्थ्यांना आता आॅनलाईन गोंधळामुळे नाहक भुर्दंड सोसावा लागत आहे. संकेतस्थळाच्या अडचणींमुळे मिरजेतील काही नेटकॅफे चालकांकडून एक अर्ज भरण्यासाठी दीडशे ते दोनशे रुपये घेतले जात आहेत.प्रथम वर्षातील या विद्यार्थ्यांच्या अडचणी वाढल्या बी. ए., बी. कॉम, बी. एस्सी, बी. सी. ए., बी. सी. एस, एल. एल. एम, एम. ए.