शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

विद्यापीठ रस्त्यावर टोळक्याने मारहाण करून युवकास लुटले

By admin | Updated: October 23, 2014 23:06 IST

घटना बुधवारी रात्री शिवाजी विद्यापीठ रस्त्यावर घडली

कोल्हापूर : मैत्रिणीसोबत बोलत उभ्या राहिलेल्या तरुणाला दुचाकीवरून आलेल्या तिघा अज्ञातांनी डोक्यावर प्रहार करून त्याच्याकडील दीड तोळ्यांची सोन्याची चेन, सहा हजार रुपये व दोन मोबाईल असा सुमारे ४२ हजार ५०० रुपयांचा माल जबरदस्तीने चोरून नेल्याची घटना काल, बुधवारी रात्री शिवाजी विद्यापीठ रस्त्यावर घडली. याबाबतची फिर्याद अमर धनाजी मोरे (वय २४, रा. जुनी एमआयडीसी श्रीनगर कॉलनी, उजळाईवाडी, ता. करवीर) याने राजारामपुरी पोलिसांत दिली आहे.याबाबत पोलिसांनी सांगितले की, उजळाईवाडी (ता. करवीर) येथील अमर मोरे हा तरुण दुचाकीवरून कावळा नाक्याकडे कामानिमित्त गेला होता. काल रात्री काम आटोपून तो घरी परतताना शिवाजी विद्यापीठ रस्त्यावरून सरनोबतवाडी नाक्याच्या पुढील रस्त्यावर त्याची मैत्रीण उभी होती तिला बघून तो थांबला. त्याचवेळी ट्रॅकसूट परिधान केलेले तिघे तरुण त्यांच्याजवळ आले. त्यांनी अमरला ‘तू अक्षा आहेस काय?’ असे म्हणू लागले. त्यावेळी ‘मी अक्षा नाही’, असे अमरने सांगितल्यावर त्यातील एकाने टणक वस्तूने त्याच्या डोक्याजवळ प्रहार केला. यावेळी अज्ञातांनी त्याच्याजवळील दीड तोळ्यांची सोन्याची चेन, सहा हजार रुपये, तसेच त्याचा व त्याच्या मैत्रिणीचा मोबाईल घेऊन अज्ञात तरुण दुचाकीवरून पसार झाले. त्यानंतर अमर मोरे याने पोलिसांत फिर्याद दिली. या प्रकरणी अज्ञातांविरोधात जबरी चोरी व मारामारीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमरने तिघा तरुणांपैकी दोघेजण पाच फूट सहा इंच, तर एक पाच फूट एक इंच उंच होता, असे वर्णन सांगितले असून, तिघेही ट्रॅकसूटमध्ये होते. यामध्ये रोख रक्कम, मोबाईल, सोन्याची चेन असा सुमारे ४२ हजार ५०० रुपये चोरीला गेल्याची नोंद पोलिसांत झाली आहे. (प्रतिनिधी)४२ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरलादीड तोळ्यांची सोन्याची चेन, सहा हजार रुपये व दोन मोबाईल, असा सुमारे ४२ हजार ५०० रुपयांचा माल जबरदस्तीने चोरून नेल्याची फिर्याद अमर मोरे याने राजारामपुरी पोलीस ठाण्यात दिली आहे.