शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

विद्यापीठाच्या उत्तरपत्रिका तपासणीत गोंधळ

By admin | Updated: March 15, 2016 00:26 IST

‘मनविसे’चा आरोप : फेरतपासणीत अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांच्या गुणांत बदल

कोल्हापूर : सन २०१४ मध्ये शिवाजी विद्यापीठाने घेतलेल्या अभियांत्रिकी विभागाच्या परीक्षेतील उत्तरपत्रिकांच्या तपासणीचे कामकाज भोंगळपणे झाले असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या (मनविसे) कार्यकर्त्यांनी सोमवारी येथे केला. फेरतपासणीत ९५ टक्के विद्यार्थ्यांच्या गुणांत बदलले असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे उत्तरपत्रिका तपासणीत दुर्लक्ष करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी ‘मनविसे’च्या शिष्टमंडळाने केली शिवाय याबाबतचे निवेदन कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांना दिले.अभियांत्रिकी विभागाच्या विविध अभ्यासक्रमांच्या सन २०१४ मध्ये झालेल्या परीक्षेनंतर विद्यार्थ्यांनी उत्तरपत्रिकांच्या फेरतपासणीसाठी अर्ज केले. फेरतपासणीनंतर गुणांमध्ये तफावत दिसून आली. माहिती अधिकारातून विद्यापीठाकडून मिळालेल्या माहितीनुसार फेरतपासणीमध्ये अभियांत्रिकीच्या ९५ टक्के विद्यार्थ्यांच्या गुणांमध्ये बदल झाला आहे. अन्य विद्यापीठांच्या तुलनेत हे प्रमाण ८० टक्क्यांनी अधिक आहे. त्यात विशेष म्हणजे गणितमधील प्रत्येक वर्षासाठी असलेल्या सर्वांमध्ये ९५ टक्के बदल झाला आहे. अन्य विषयांतील गुणांत देखील बदल झाले आहेत. यावरून उत्तरपत्रिका तपासणीचे काम भोंगळपणे झाल्याचे दिसून येते. परीक्षा नियंत्रकांकडे देखील आम्ही उत्तरपत्रिका तपासणीचा मुद्दा मांडला. पण, त्यांनी गांभीर्याने घेतले नाही. उत्तरपत्रिकांची योग्य पद्धतीने तपासणी न करणाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी शिष्टमंडळाने निवेदनाद्वारे केली आहे. त्यावर कुलगुरू डॉ. शिंदे यांनी या प्रकरणाची योग्य ती माहिती घेऊन पुढील कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन शिष्टमंडळाला दिले. शिष्टमंडळात ‘मनसे’चे नगरसेवक राजू दिंडोर्ले, ‘मनविसे’चे जिल्हाध्यक्ष अभिजित राऊत, शहराध्यक्ष मंदार पाटील, प्रसाद साळोखे, अमोल कुंभार, उत्तम वंदुरे, अजित लोहार, रोहित शिंदे, संतोष खटावकर, किरण कोरे, आदींचा समावेश होता. (प्रतिनिधी)