शहरं
Join us  
Trending Stories
1
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
2
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
3
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
4
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
5
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
6
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
7
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
8
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी
9
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
10
दुधात थुंकून, तेच दूध ग्राहकांना द्यायचा; किळसवाणं कृत्य CCTV मध्ये कैद झाल्यानंतर शरीफला अटक!
11
'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 
12
गैर-मुस्लिमांचे धर्मांतरण कराणाऱ्या झांगूर बाबाला अटक, मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा अन्...
13
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
14
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
15
IND VS ENG : ऋषभ पंतनं केला षटकारांचा महाविक्रम, बेन स्टोक्स-मॅथ्यू हेडनलाही टाकलं मागे
16
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा
17
Unplayable Delivery! आकाश दीपसमोर जो रुट चारीमुंड्याचित! विजयातील मोठा अडथळा दूर (VIDEO)
18
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
19
ENG vs IND :आता यजमान इंग्लंडची खैर नाही! टीम इंडियानं 'बॅझबॉल'वाल्यांसमोर सेट केलं मोठं टार्गेट

कोल्हापूरच्या शिक्षकाची पाणी वाचविण्याची अनोखी चळवळ

By admin | Updated: September 28, 2015 23:52 IST

मिलिंद यादव यांचा प्रयत्न : वर्षाच्या परिश्रमाला आता मिळतेय बळ

संदीप आडनाईक -कोल्हापूर -पाणी ही राष्ट्रीय संपत्ती आहे, ती जपून वापरा असा संदेश दुसऱ्यांना सांगणारे अनेकजण भेटतील; परंतु त्यासाठी स्वत:पासून प्रयत्न करणारा विरळाच. कोल्हापुरातील शिक्षक मिलिंद यादव मात्र याला अपवाद आहेत. काही वर्षांपूर्वी शाळेच्या परिसरातील पाण्याचे वाहते नळ बंद करण्यास त्यांनी प्रारंभ केला. त्यांच्या या परिश्रमाला आता कुठे बळ मिळू लागले आहे. मिलिंद हे कोल्हापुरातील सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय चळवळीत अग्रेसर असलेले नाव. प्रिन्स शिवाजी मराठा हायस्कूलमध्ये कलाशिक्षक. कोल्हापुरातील अनेक चळवळींना त्यांनी जन्म दिला, असे म्हणणे वावगे ठरणार नाही. जीवन बोडकेसारख्या अवघ्या सहा मित्रांच्या मदतीने मूर्तीदान, निर्माल्य दान या चळवळीला १९८५ मध्ये प्रारंभ केला होता. चिल्लर पार्टीसारख्या उपक्रमातून लहान मुलांमध्ये चित्रपट चळवळ जोपासण्याचा ते प्रयत्न करत आहेत. पारंपरिक खेळ, टाकाऊपासून टिकाऊ वस्तू, दुर्मीळ बियांचे जतन, खतनिर्मिती असे विविध प्रयोग आणि चळवळ त्यांच्या प्रयत्नातून सुरू झाल्या आहेत. विज्ञान प्रबोधिनी, निसर्गमित्र यासारख्या संस्थांची पाणी वाचविण्याची मोहीमही दहा वर्षांपूर्वीच कोल्हापुरात सुरू झाली. आता त्याला बळ मिळू लागले आहे. जुना बुधवार पेठेतून शाळेला जाता-येता या परिसरातील महिला आणि नागरिक घरासमोरील पाण्याचे नळ गरज नसताना सुरू ठेवतात. यामुळे कितीतरी पाणी वाया जाते, हे मिलिंद यांच्या लक्षात आले. सुरुवातीला अनेकांना त्यांनी समजावून सांगितले; परंतु नंतर मात्र त्यांनी स्वत:च ते नळ बंद करण्यास सुरुवात केली. गेली काही वर्षे सातत्याने ते न थकता हे काम करत आले आहेत. शाळेतील एका पाण्याच्या नळातून गळणारे पाणी किती वाया जाते याचे मिलिंद यांनी एकदा चित्रीकरण केले, तेव्हा एका मिनिटात २५० मिलीलिटर पाणी वाया गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. मग एका तासात वाया गेलेल्या १५ लिटर पाण्याच्या हिशेबात महानगरपालिकेला वर्षाला ५६२९ रुपये इतके विनाकारण भरावे लागल्याचे लक्षात आल्यानंतर मिलिंद यांनी परिसरातील किती ठिकाणच्या नळाचे पाणी वाया जाते, याचा अभ्यास सुरू केला आणि त्याबाबत स्वत:च जनजागृती सुरू केली. त्यांनी स्वत:च्या शाळेत विद्यार्थी, माता पालक यांना पाणी वाचविण्यासंदर्भात तसेच दुष्काळाची गंभीर स्थिती दाखविण्यासाठी स्लाईड शोचे आयोजन केले. त्यांच्या प्रयत्नामुळे बचत गटाच्या महिलांनी गल्लोगल्ली फिरून ‘पाणी जपून वापरा’ असा संदेश द्यायला सुरुवात केली. मिलिंद यादव यांच्यासारख्या एका व्यक्तीच्या या छोटाशा प्रयत्नामुळे भविष्यात ही मोठी चळवळ निर्माण होईल. कोल्हापूरच्या शिक्षकाची पाणी वाचविण्याची अनोखी चळवळमिलिंद यादव यांचा प्रयत्न : वर्षाच्या परिश्रमाला आता मिळतेय बळ संदीप आडनाईक ल्ल कोल्हापूरपाणी ही राष्ट्रीय संपत्ती आहे, ती जपून वापरा असा संदेश दुसऱ्यांना सांगणारे अनेकजण भेटतील; परंतु त्यासाठी स्वत:पासून प्रयत्न करणारा विरळाच. कोल्हापुरातील शिक्षक मिलिंद यादव मात्र याला अपवाद आहेत. काही वर्षांपूर्वी शाळेच्या परिसरातील पाण्याचे वाहते नळ बंद करण्यास त्यांनी प्रारंभ केला. त्यांच्या या परिश्रमाला आता कुठे बळ मिळू लागले आहे. मिलिंद हे कोल्हापुरातील सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय चळवळीत अग्रेसर असलेले नाव. प्रिन्स शिवाजी मराठा हायस्कूलमध्ये कलाशिक्षक. कोल्हापुरातील अनेक चळवळींना त्यांनी जन्म दिला, असे म्हणणे वावगे ठरणार नाही. जीवन बोडकेसारख्या अवघ्या सहा मित्रांच्या मदतीने मूर्तीदान, निर्माल्य दान या चळवळीला १९८५ मध्ये प्रारंभ केला होता. चिल्लर पार्टीसारख्या उपक्रमातून लहान मुलांमध्ये चित्रपट चळवळ जोपासण्याचा ते प्रयत्न करत आहेत. पारंपरिक खेळ, टाकाऊपासून टिकाऊ वस्तू, दुर्मीळ बियांचे जतन, खतनिर्मिती असे विविध प्रयोग आणि चळवळ त्यांच्या प्रयत्नातून सुरू झाल्या आहेत. विज्ञान प्रबोधिनी, निसर्गमित्र यासारख्या संस्थांची पाणी वाचविण्याची मोहीमही दहा वर्षांपूर्वीच कोल्हापुरात सुरू झाली. आता त्याला बळ मिळू लागले आहे. जुना बुधवार पेठेतून शाळेला जाता-येता या परिसरातील महिला आणि नागरिक घरासमोरील पाण्याचे नळ गरज नसताना सुरू ठेवतात. यामुळे कितीतरी पाणी वाया जाते, हे मिलिंद यांच्या लक्षात आले. सुरुवातीला अनेकांना त्यांनी समजावून सांगितले; परंतु नंतर मात्र त्यांनी स्वत:च ते नळ बंद करण्यास सुरुवात केली. गेली काही वर्षे सातत्याने ते न थकता हे काम करत आले आहेत. शाळेतील एका पाण्याच्या नळातून गळणारे पाणी किती वाया जाते याचे मिलिंद यांनी एकदा चित्रीकरण केले, तेव्हा एका मिनिटात २५० मिलीलिटर पाणी वाया गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. मग एका तासात वाया गेलेल्या १५ लिटर पाण्याच्या हिशेबात महानगरपालिकेला वर्षाला ५६२९ रुपये इतके विनाकारण भरावे लागल्याचे लक्षात आल्यानंतर मिलिंद यांनी परिसरातील किती ठिकाणच्या नळाचे पाणी वाया जाते, याचा अभ्यास सुरू केला आणि त्याबाबत स्वत:च जनजागृती सुरू केली. त्यांनी स्वत:च्या शाळेत विद्यार्थी, माता पालक यांना पाणी वाचविण्यासंदर्भात तसेच दुष्काळाची गंभीर स्थिती दाखविण्यासाठी स्लाईड शोचे आयोजन केले. त्यांच्या प्रयत्नामुळे बचत गटाच्या महिलांनी गल्लोगल्ली फिरून ‘पाणी जपून वापरा’ असा संदेश द्यायला सुरुवात केली. मिलिंद यादव यांच्यासारख्या एका व्यक्तीच्या या छोटाशा प्रयत्नामुळे भविष्यात ही मोठी चळवळ निर्माण होईल. स्लाईड शोमिलिंद यादव यांनी रंकाळा परिसरातील बंद न केलेल्या नळाच्या वाहत्या पाण्यामुळे पाण्याचा कसा अपव्यय होतो, याचे चित्रीकरण केले आहे. १४ मिनिटांचा हा स्लाईड शो गणेशोत्सवात दाखविण्याचा उपक्रम त्यांनी सुरू केला आहे.