शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

व्हॅली क्रॉसिंगद्वारे हवेत तरंगत अनोखा विवाह

By admin | Updated: July 30, 2016 00:33 IST

जयदीप, रेश्मा यांचा संकल्प : शाहूवाडीतील भाततळीत उद्या साहसी सोहळा

कोल्हापूर : वेस्टर्न माउंटन स्पोर्टस व हिल रायडर्स अ‍ॅँड हायकर्स गु्रपचे सदस्य जयदीप गुणाजीराव जाधव व पाडळी खुर्दची रेश्मा पाटील हे दोघे साहसी पद्धतीने शाहूवाडीतील भाततळी परिसरातील जखनाईचा कडा येथे उद्या, रविवारी दुपारी १२ वाजता विवाहबद्ध होत आहेत. ते गिर्यारोहणातील व्हॅली क्रॉसिंग तंत्र वापरून हवेत तरंगत लग्न करणार आहेत. गेल्या १७ वर्षांपासून वेस्टर्न माउंटन व हिल रायडर्स गु्रपच्या माध्यमातून जयदीप जाधवने गिर्यारोहणाची व भटकंतीची आवड सांभाळली. त्यामुळे जयदीपने आपल्या जीवनातील महत्त्वपूर्ण क्षण म्हणजेच विवाह हासुद्धा गिर्यारोहणाच्या तंत्राने व्हावा, असे मनोगत गु्रपचे विनोद कांबोज, प्रमोद पाटील व मुंबईतील मलय अ‍ॅडव्हेंचर्सचे मेहबूब मुजावर या ज्येष्ठांपुढे व्यक्त केले. यासाठी जागेची पाहणी करून विशाळगडचा पवित्र परिसर निवडला. हे निवडण्यामागे १७ वर्षांपूर्वी पन्हाळा-पावनखिंड या मोहिमेने जयदीपने गिर्यारोहणाची सुरुवात केली होती.प्रथम जयदीपने ही साहसी विवाहाची गोष्ट घरच्यापुढे बोलून दाखविली. त्याला घरच्यांनी विरोध केला; पण त्याच्या गिर्यारोहणाच्या वेडापायी त्यांनीही होकार दर्शविला. गिर्यारोहणाची आवड असणारी रेश्मा पाटील हिलाही त्यांनी ही साहसी लग्नाची कल्पना सांगितली. त्यावर तीही तयार झाली. त्या दृष्टीने तिच्या नातेवाइकांनीही या अनोख्या विवाहास मान्यता दिली. हा विवाह आता उद्या दुपारी १२ च्या मुहूर्तावर होत आहे. तो शाहूवाडीतील भाततळी परिसरात जखनाईचा कडा आहे. त्यावर गिर्यारोहणातील व्हॅली क्रॉसिंगचे तंत्र वापरून करण्यात येणार आहे. यासाठी सर्व साधनसामग्रीची जय्यत तयारी केली आहे. पश्चिम महाराष्ट्रात असा विवाह प्रथमच होत आहे. त्यामुळे या विवाहाबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.