शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

सांगवडे येथील पक्षीमित्र माधव जोशी यांचा अनोखा उपक्रम

By admin | Updated: July 18, 2014 23:44 IST

परसात सुगरणींचे आगमन : सांगवडे येथील पक्षीमित्र माधव जोशी यांचा अनोखा उपक्रम

परसात सुगरणींचे आगमन : सांगवडे येथील पक्षीमित्र माधव जोशी यांचा अनोखा उपक्रम कोल्हापूर : एक घास चिऊचा... एक घास काऊचा असं म्हणत आई आपल्या तान्हुल्याला एक ... एक... घास भरवायची, त्यावेळी त्या तान्हुल्याची उत्सुकता वाढायची. चिऊताईच्या हालचाली न्याहाळीत आई देईल तो घास घशातून खाली उतरत रहायचा. आईचा हेतू साध्य व्हायचा आणि तान्हुल्याचं पोटही भरायचं! परंतु, आता ही चिऊताई दुर्मीळ होऊ लागलीय आणि तिला दाखवीत घास भरविणारी आईसुद्धा! कारण चिऊताईची जागा मिकी माऊसने घेतलीय, तर आईची जागा मम्मीनं! परंतु, या बदलत्या परिस्थितीतही एका अवलियानं चिऊताईचं हे अस्तित्व जपण्याचा आणि त्यांच्यापासून मिळणारा आनंद परिसरातील लहानथोरांना मिळवून देण्याचा प्रयत्न आपल्यापरीने सुरू ठेवलाय. करवीर तालुक्यातील सांगवडे येथील माधव रा. जोशी हे या अवलियाचं नाव आहे. पक्षीमित्र माधव जोशी यांनी अनेक वर्षांपासून हा छंद जोपासला आहे. काळाच्या ओघात चिमण्यांचं प्रमाण अतिशय कमी झालं आहे. मात्र, जोशींच्या परसात दरवर्षी जून ते सप्टेंबर अशा चार महिन्यांत सुगरणी चिमण्या येथे येत असतात. यंदाही या सुगरणी चिमण्यांचे आगमन झाले आहे. चिमण्यांचं आगमन झाल्यापासून जोशी कुटुंबीय त्यांना खाऊ पिऊ घालतात. त्यांच्यासाठी परसात एक स्वतंत्र कक्ष उभारला असून, पाण्याचा छोटा कुंडही तयार करून घेतला आहे. अलीकडे दुर्मीळ होत असलेल्या या चिमण्यांवर जोशी कुटुंबीय जणू काही आपले नातलग असल्याप्रमाणे मनापासून प्रेम करतात. लहान मुलांना चित्रात चिमण्या दाखविणारे गावातील वृद्ध आपल्या नातवांना घेऊन जोशी यांच्या घरी चिमण्या दाखविण्यास येतात. या चिमण्यांच्या दर्शनाने चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर हास्य खुलते. या चिमण्या पाहताना गावातील मुलं गुंग होऊन जातात. आपल्या जीवनात शिलाई मशीनच्या व्यापातून वेळ काढून जोशी हे चिमण्यांसाठी रोज दोन ते अडीच किलो तांदूळ घालतात. त्यामुळे या चिमण्यांनाही जोशींचा लळा लागलेला आहे. परसात दाणे टिपणाऱ्या या चिमण्यांची हालचाल लक्षवेधी असते. या पाहुण्यांना न्याहाळण्यासाठी लहानांपासून मोठ्यांचीही गर्दी होते. जून महिन्यात आलेल्या या चिमण्या सप्टेंबरमध्ये निघून जातात, ते पुढच्या वर्षी न चुकता येण्याचे अभिवचन देऊनच! माणुसकीला विसरलेल्या जगात चिमण्यांवर निर्व्याज प्रेम करणारे जोशी आणि त्यांच्या परसात येणाऱ्या चिमण्या गावातील लोकांचा कुतूहलाचा विषय बनून गेला आहे. (प्रतिनिधी)