शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

उतारवयात टेन्शन, हाती जुनीच पेन्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2015 01:29 IST

पेन्शनधारकांची सरकारकडून थट्टा : निधी असूनही परवानगीअभावी वितरण रखडले; दोनशे ते तीनशे रुपयेच पदरात

कोल्हापूर : किमान एक हजार रुपये पेन्शन देण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाच्या अंमलबजावणीला वर्ष होण्यापूर्वीच त्याबाबत सरकारने हात आखडता घेतला आहे. त्याद्वारे देशातील २७ लाख पेन्शनधारकांची थट्टा केली आहे. भविष्यनिर्वाह निधी कार्यालयाकडे त्यासाठीचा निधी असूनही त्याच्या वितरणाची सूचना, परवानगी सरकारने दिलेली नाही. त्यामुळे एप्रिलपासूनची पेन्शन दोनशे ते तीनशे रुपये अशा जुन्या दराने वृद्ध, ज्येष्ठांच्या पदरात पडणार आहे. विविध मागण्यांसाठी सेवानिवृत्तीधारकांच्या (पेन्शनर) चळवळी आक्रमक झाल्यानंतर त्यांना शांत करण्यासह सरकार काही, तरी करत आहे. ते दाखविण्यासाठी केंद्र सरकारने किमान एक हजार पेन्शन देण्याचा निर्णय घेतला. तज्ज्ञ समितीने केलेल्या शिफारशीनुसार सरकारने मार्च २०१४ अखेरपर्यंत किमान एक हजार रुपये पेन्शन देण्याचे निश्चित केले. त्यानुसार ‘एम्पालॉईज पेन्शन स्कीम ९५’ अंतर्गत वाढीव पेन्शन वितरीत करण्यात आली. मात्र, एप्रिलच्या पेन्शनच्या रकमेबाबत आवश्यक त्या सूचना न दिल्याने भविष्य निर्वाह निधी खात्याने मे महिन्याच्या सुरुवातीस जमा होणारी पेन्शन जुन्या दराने काढण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचा फटका देशातील २७ लाख पेन्शनरांना बसणार आहे. त्यात सहकारी बँका, एस. टी., एमएसईबी, साखर व अन्य कारखान्यांतील कामगारांचा समावेश आहे. शिवाय यात पाच विधवा महिलादेखील आहेत. त्यांच्या हातात पूर्वीप्रमाणे दोनशे ते तीनशे रुपये पेन्शन मिळणार आहे. ज्या कामगारांच्या कष्टातून देशाचा विकास झाला. त्यांना निवृत्तीनंतर किमान पेन्शन देण्याचा निर्णय कायम करण्यासाठी सरकारला वेळ मिळत नसल्याने त्याविरोधात पेन्शनरांची राष्ट्रीय समन्वय समिती आक्रमक झाली आहे. त्यांनी याकडे सरकारचे लक्ष वेधण्यासह किमान एक हजार पेन्शन देण्याचा सकारात्मक निर्णय घेण्यासाठी आंदोलनाची तीव्रता वाढविली आहे. पेन्शनबाबत अशा पद्धतीने सुरू असलेली थट्टा देशाची श्रमशक्ती ठरलेल्या लोकांसाठी मारक ठरत आहे. (प्रतिनिधी)