शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

ऊसतोड मजूर बनले शेतमजूर

By admin | Updated: May 4, 2016 00:06 IST

दुष्काळाचा परिणाम : गळीत हंगाम संपूनही मजूर अद्याप गावातच

गणपती कोळी --कुरूंदवाड --उसाचा गळीत हंगाम संपण्यापूर्वीच ऊसतोड मजुरांना गावाकडे परतीचा वेध लागलेला असतो़ यंदाचा गळीत हंगाम संपून आठवडा संपला तरी अनेक भागात ऊसतोड मजूर अद्याप गावातच आहेत़ गावाकडे पाणीच नसल्याने जनावरे कशी जगवायची म्हणून याच भागात राहून शेतीच्या कामाच्या शोधात आहेत़ कोल्हापूर जिल्हा पाण्यासाठी समृध्द असल्याने या भागात ऊस शेती मोठी आहे़ त्यामुळे या पिकांवर प्रक्रिया करणारे साखर कारखानेही मोठ्या प्रमाणात आहेत. याउलट इंडी या भागातील शेतकऱ्यांची शेती मोठी असूनही शेतीसाठी पाण्याची कमतरता असल्याने या भागातील बहुतांश शेतकरी मजुरी मिळविण्यासाठी ऊसतोडीसाठी कोल्हापूर जिल्ह्यात सहा ते सात महिने जनावरे व कुटुंबाला घेऊन ऊसतोडीच्या निमित्ताने स्थलांतर करत असतात़मजूरांच्या गावाकडे शेतीवाडी असूनही पाण्याअभावी पावसाळी पिकेच घेतली जातात़ संसाराचा गाढा ऊस ठेकेदार मुकादम, वाहनमालक यांच्याकडून उचलीवर व जनावरांच्या दुभत्यावर चालतो़ उसाचा गळीत हंगाम संपत आला की या मजुरांना गड्या आपला गाव बरा म्हणून गावाकडे परतण्याची ओढ लागलेली असते़ यंदा बीड, उस्मानाबाद, लातूर, कर्नाटकातील इंडी, जालना या जिल्ह्यांत दुष्काळाची तीव्रता वाढली आहे़ कुपनलिका, विहिरी आटल्याने माणसांच्या पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर बनली आहे़ त्यामुळे जनावरांना चारा तर नाहीच शिवाय त्यांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध होणेही कठीण बनले आहे़ त्यामुळे ऊसतोडीसाठी आलेल्या मजुरांनी गावाकडे असलेल्या नातेवाईकांशी संपर्क करुन परिस्थितीची माहिती घेऊन किमान एखादा वळवाचा पाऊस पडून विहीर, कूपनलिकांना पाणी येईपर्यंत ऊसतोडीच्या भागातच राहण्याचा निर्णय घेतला आहे़ ऊसतोड करणाऱ्या मजुरांना शेतातील मजुरीची कामे फारसे जमत नाही़ मात्र परिस्थितीमुळे जनावरांच्या चाऱ्यासाठी व रोजचा चरितार्थ चालविण्यासाठी शेतीच्या कामाच्या शोधात लागले आहेत़ दुष्काळाची छाया कोल्हापूर जिल्ह्यातही जाणवत असून, नदीतील पाणी आटल्याने पाण्याअभावी या भागातील उभे पिकही करपू लागले आहेत़ त्यामुळे शेतीची कामेही ठप्प असल्याने या ऊसतोड मजुरांना मजुरीअभावीही हाल सोसावे लागत आहे़