शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

जयसिंगपूरसाठी भुयारी गटर योजना

By admin | Updated: March 3, 2015 21:31 IST

६० ते ७० कोटी खर्च अपेक्षित : सांडपाण्याचा प्रश्न निकाली निघणार; सांडपाणी प्रक्रिया केंद्रही उभारणार

संदीप बावचे - जयसिंगपूर -कोणतीही करवाढ न करता नगरपालिकेने शहरात विकासकामे राबविण्याचा निर्णय घेऊन आणखी एक विकासात्मक पाऊल टाकले आहे. शहरात भुयारी गटर योजना राबविण्यात येणार असून, ६० ते ७० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. ही योजना राबवीत असताना सांडपाणी प्रक्रिया केंद्रही उभारले जाणार आहे. आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाची असणाऱ्या या योजनेचे सर्वेक्षण करण्याचे काम सुरू आहे.नळपाणी योजनेबरोबरच शहराला भुयारी गटर योजना राबविण्याच्या दृष्टिकोनातून जयसिंगपूर पालिकेने पाऊल टाकले आहे. शहरात आंबेडकर सोसायटी, शाहूनगर, संभाजीनगर या तीन मुख्य ठिकाणी नाले असून, त्याचे सांडपाणी शहरातील स्टेशन रोडवर एकत्रित होते. २० वर्षांत वाढीव वसाहतीमुळे शहराच्या लोकसंख्येत वाढ झाली आहे. परिणामी शहराला भुयारी गटर योजनेची गरज भासू लागली. आरोग्याच्या दृष्टीने भुयारी गटर योजना महत्त्वाची असल्याने नगरपालिकेने सुमारे ६० ते ७० कोटी रुपये अपेक्षित खर्च असणारी ही योजना राबविण्याचा निर्णय घेऊन नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पीय विशेष सभेत योजनेसाठी तीस कोटींची तरतूद केली आहे. सुमारे शंभर किलोमीटर अंतराच्या नलिका टाकण्याचे नियोजन आहे. योजना राबविण्याच्या दृष्टिकोनातून सर्वेक्षण करण्याचे काम सुरू असून त्यानंतरच शहरात किती सांडपाणी साचते, हे सांडपाणी निचरा करण्यासाठी किती खर्च, योजनेसाठी किती कोटी रुपयांचा निधी अपेक्षित असेल हे समजणार आहे. योजना राबवीत असताना सांडपाणी प्रक्रिया केंद्रही उभारण्याचे नियोजन आहे. जेणेकरून या पाण्यावर प्रक्रिया करून ते पाणी शेतीसाठी व बागेसाठी तसेच पाणी संस्थांना देऊन पालिकेचे उत्पन्न वाढविण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. सध्या भुयारी गटर योजना आराखडा तयार करण्याच्या दृष्टिकोनातून सर्वेक्षण सुरू आहे. असे असले तरी भुयारी गटर योजनेची पाईपलाईन अडचणीची ठरू नये, याचे देखील नियोजन करणे महत्त्वाचे आहे.भुयारी गटर योजनेसाठी आराखडा मंजूर करून तो शासनाकडे पाठविला जाणार आहे. १५ टक्के नगरपालिका, ४५ टक्के शासनाचा निधी अशी ही योजना आहे. योजना मंजुरीनंतर शासनाकडून ३० कोटी रुपयांचा निधी अपेक्षित धरून अर्थसंकल्पात तशी तरतूद केली आहे. सांडपाणी प्रक्रिया केंद्र उभारण्यात आल्यानंतर निश्चितच पालिकेच्या उत्पन्नातही भर पडणार आहे. - हेमंत निकम, मुख्याधिकारी घरगुती सांडपाण्याचा प्रश्न निकालातशहरामध्ये १०० टक्के भुयारी गटर योजना राबविण्यात येणार असल्यामुळे घरगुती सांडपाण्याचा प्रश्न निकालात निघणार आहे. आराखडा तयार करण्यासाठी चार महिन्यांची मुदत आहे. सर्वेक्षणानंतरच अपेक्षित खर्च व येणाऱ्या अडचणी समजणार आहेत. पर्यायाने या योजनेमुळे सांडपाण्याचा प्रश्न निकालात निघेल, अशी अपेक्षा पालिकेकडून व्यक्त केली जात आहे.