शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

दुहेरी नगरसेवक पद्धतीने अस्वस्थता

By admin | Updated: March 10, 2016 23:57 IST

राजकीय क्षेत्रात खळबळ : प्रभाग रचना बदलणार, जनतेतून नगराध्यक्ष निवड

राजाराम पाटील --इचलकरंजी नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी एकेरी नगरसेवक प्रभागाची रचना बदलून दुहेरी नगरसेवक प्रभाग आणि जनतेतून नगराध्यक्ष निवड अशी पद्धती अस्तित्वात येत असल्याने येथील राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. अशा निवडणुकीतून राजकीय पद्धतीत होणाऱ्या स्थित्यंतरामुळे निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्यांमध्ये अस्वस्थता वाढली आहे.इचलकरंजी नगरपालिकेमध्ये झालेल्या बहुतांशी निवडणुका एकेरी नगरसेवक प्रभाग पद्धतीने झाल्या आहेत. मात्र, २००१ मध्ये झालेल्या निवडणुकीसाठी तिहेरी नगरसेवक प्रभाग आणि २०११ मधील निवडणुका चार नगरसेवक प्रभाग पद्धतीने झाल्या. २००१ मधील अपवाद वगळता सर्व निवडणुकांवेळी निवडून आलेल्या नगरसेवकांतूनच नगराध्यक्षांची निवड झाली.एकेरी नगरसेवक प्रभाग पद्धतीमध्ये पक्ष किंवा नोंदणीकृत आघाडीऐवजी अपक्ष नगरसेवक निवडून येण्याची अधिक संधी असते आणि अपक्ष निवडून आले की, घोडेबाजार अधिक होतो, अशा निरीक्षणामुळे एकापेक्षा अधिक नगरसेवकांचे प्रभाग करून निवडणुका घेण्याची पद्धत संबंधित सरकारकडून अवलंबली जात आहे. २०११ मध्ये झालेल्या नगरपालिकांच्या निवडणुकीत चार नगरसेवकांच्या प्रभागांची पद्धती अवलंबली. त्याचा चांगला लाभ दोन्ही कॉँग्रेसला झाला. त्यामुळे सध्याच्या सरकारकडून तीन किंवा चार नगरसेवकांच्या प्रभागाऐवजी आता दुहेरी नगरसेवक प्रभाग पद्धत अवलंबली जात असल्याची चर्चा आहे.साधारणत: दोन महिन्यांपूर्वी आगामी नगरपालिका निवडणुकीसाठी नगराध्यक्षपदाच्या आरक्षण सोडती काढण्यात आल्या. त्यावेळी नगरपालिकांच्या निवडणुका एकेरी प्रभाग पद्धतीने होणार, अशी चर्चा सर्वत्र पसरली. त्याचा परिणाम म्हणून आगामी निवडणुकांना इच्छुक असलेल्यांनी आपापले संभाव्य प्रभाग निश्चित करून ‘तयारी’ सुरू केली. असे इच्छुक प्रभागातील सेवा-सुविधांसाठी आंदोलने करू लागले. या पार्श्वभूमीवर निवडणुकीसाठी आता दुहेरी नगरसेवक प्रभाग आणि नगराध्यक्ष जनतेतून निवडला जाणार, अशी पद्धत सरकार अवलंबणार असल्याच्या वृत्ताने येथील राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे, तर अपक्ष म्हणून उमेदवारीची तयारी केलेल्या इच्छुकांमध्ये अस्वस्थता वाढली आहे. २००१ मध्ये तीन नगरसेवकांचा प्रभाग आणि जनतेतून नगराध्यक्ष निवड अशी पद्धत अवलंबण्यात आली. त्यावेळी कॉँग्रेसकडून नगराध्यक्षा म्हणून किशोरी आवाडे निवडून आल्या. मात्र, त्यांच्या कॉँग्रेस पक्षास बहुमत मिळाले नाही. म्हणून तत्कालीन शहर विकास आघाडीबरोबर कॉँग्रेसला आघाडी करावी लागली.