शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

खर्चीवाले यंत्रमागधारकांत अस्वस्थता

By admin | Updated: February 19, 2016 00:28 IST

मजुरीवाढीचा प्रश्न : व्यापाऱ्यांकडून नकाराची भूमिका; संयुक्त बैठकही नाही

इचलकरंजी : खर्चीवाले यंत्रमागधारकांच्या मजुरीवाढीबाबत प्रांताधिकाऱ्यांकडून कापड उत्पादक व्यापारी व यंत्रमागधारक प्रतिनिधी यांच्या संयुक्त बैठकीचे आयोजन झाले नसल्याने यंत्रमागधारकांमध्ये नाराजी पसरली आहे. व्यापारीवर्गाची नकाराची भूमिका आणि सातत्याने होत असलेले नुकसान यामुळे यंत्रमागधारक अस्वस्थ झाला आहे.गेल्या तीन वर्षांमध्ये यंत्रमाग कामगारांच्या व अन्य प्रकारच्या मजुरीमध्ये, तसेच महागाईमध्ये वाढ झाली असताना यंत्रमागधारकांकडून जॉबवर्क पद्धतीने कापड उत्पादन करून घेणाऱ्या व्यापाऱ्यांनी त्यांच्या मजुरीमध्ये वाढ केलेली नाही. याचा परिणाम म्हणून खर्चीवाले यंत्रमागधारक नुकसानीत जाऊ लागले आहेत. या पार्श्वभूमीवर विजेच्या दरामध्येसुद्धा ३0 टक्के वाढ झाली आहे. म्हणून अस्वस्थ झालेल्या यंत्रमागधारकांनी इचलकरंजी पॉवरलूम असोसिएशनकडे धाव घेतली. पॉवरलूम असोसिएशननेसुद्धा गेले दीड महिने प्रयत्न करूनही व्यापाऱ्यांकडून टाळाटाळ केली जात आहे. म्हणून याबाबत योग्य तो तोडगा काढण्यासाठी प्रांताधिकाऱ्यांनी मध्यस्थी करावी, अशी विनंती करण्यात आली.सोमवारी प्रांताधिकारी कार्यालयात झालेल्या कापड व्यापारी व यंत्रमागधारक संघटना प्रतिनिधींच्या बैठकीत दोन तास चर्चा होऊनसुद्धा तोडगा निघाला नाही. म्हणून त्या प्रश्नाबाबत पुन्हा बैठक बोलविण्याचे ठरले. या बैठकीसाठी प्रांताधिकारी अश्विनी जिरंगे यांनी तारीख देण्याचे निश्चित केले. मात्र, याला चार दिवस उलटले तरी संयुक्त बैठकीचे आयोजन झाले नसल्याने खर्चीवाला यंत्रमागधारक अस्वस्थ बनला आहे. दरम्यान, पॉवरलूम असोसिएशनचे एक शिष्टमंडळ पोलीस उपअधीक्षक विनायक नरळे यांना भेटले. त्यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष सतीश कोष्टी यांनी खर्चीवाले यंत्रमागधारकांच्या मजुरीवाढीच्या प्रश्नाबाबत आढावा घेतला. तसेच कामगारांच्या वेतनाबाबत त्यांच्या पुढाऱ्यांकडून खोट्या तक्रारी केल्या जातात. कापड व्यापाऱ्यांच्या अनिष्ट प्रथा येथील यंत्रमाग उद्योगाला अडचणीच्या ठरत आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी सहायक कामगार आयुक्त अनिल गुरव, कामगार अधिकारी डी. डी. पवार, दत्तात्रय कनोजे, नारायण दुरुगडे, महंमदरफिक खानापुरे, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)