शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

उमा पानसरेंच्या निवासस्थानी सुरक्षा वाढविली

By admin | Updated: March 27, 2015 00:21 IST

पोलीस तळ ठोकून : गुन्हेगारांचा कर्नाटकात शोध जारी; तपासाला पुन्हा गती

कोल्हापूर : ज्येष्ठ कामगार नेते गोविंद पानसरे यांच्या हत्येतील प्रत्यक्षदर्शी साक्षीदार त्यांच्या पत्नी उमा पानसरे यांच्या निवासस्थानी असलेल्या सुरक्षेत वाढ करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, मिरजेतील ‘त्या’ सराईत गुन्हेगाराचा कर्नाटकात कसून शोध सुरू असून, त्याचा शोध घेऊनच माघारी परतण्याचे आदेश वरिष्ठांनी पथकांना दिले असल्याने ही पथके कर्नाटकातच तळ ठोकून असल्याची पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आली. मिरजेतील ‘त्या’ दाम्पत्याने दिलेल्या माहितीच्या आधारावर पोलिसांचा थंडावलेला तपास पुन्हा जोमाने सुरू झाला आहे. संबंधित गुन्हेगार हाती लागणे पोलिसांच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. त्यानंतरच या घटनेमागील सत्य समोर येणार आहे. हत्येच्या प्रत्यक्षदर्शी साक्षीदार उमा पानसरे यांच्या निवासस्थानी चोवीस तास सशस्त्र पोलीस बंदोबस्त आहे. गेल्या दोन दिवसांपासून येथील सुरक्षा वाढविण्यात आली आहे. सहायक पोलीस निरीक्षक मीना जगताप या पानसरे यांच्या घरी तळ ठोकून आहेत; तर पोलीस मुख्यालयातील पाच व राजारामपुरी पोलीस ठाण्यातील पाच असे दहा सशस्त्र पोलीस चोवीस तास निवासस्थानाबाहेर तैनात करण्यात आले आहेत. या बंगल्यापासून काही अंतरावरच काही सराईत गुन्हेगारांचे वास्तव्य असलेला जवाहरनगर व सुभाषनगर परिसरातील गुन्हेगारांच्या हालचालींवर साध्या वेशातील पोलिसांचे विशेष पथक लक्ष ठेवून आहे. बंगल्यासभोवती असलेल्या सुरक्षारक्षकांची दोन शिफ्टमध्ये ड्यूटी लावण्यात आली आहे. त्यामुळे या परिसरात ये-जा करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या हालचालीवर नजर ठेवली जात आहे. पोलीस निरीक्षक अमृत देशमुख हे रात्री उशिरापर्यंत या परिसरात तळ ठोकून होते. (प्रतिनिधी)