शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

उदगावला प्राथमिक आरोग्य केंद्र

By admin | Updated: March 17, 2016 23:42 IST

आरोग्य विभागाकडून मंजुरी : चिंचवाडलाही होणार आरोग्य उपकेंद्र

जयसिंगपूर : जयसिंगपूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्र उदगाव येथे स्थलांतरित करण्याला महाराष्ट्र शासन आरोग्य विभागाकडून मंजुरी मिळाली असून, जयसिंगपूर येथे सुसज्ज ग्रामीण रुग्णालय होणार आहे़ तर कवठेगुलंद येथे प्राथमिक आरोग्य केंद्राचा मार्ग मोकळा झाल्यामुळे जयसिंगपूर, उदगाव व कवठेगुलंद या गावांना तत्पर आरोग्य सेवा मिळणार आहे़ गेल्या तीन वर्षांपासून जयसिंगपूरला ग्रामीण रुग्णालयासाठी निधी मंजूर झाला आहे़ मात्र, तो जागेअभावी रखडला होता़ तसेच जयसिंगपूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्र उदगाव येथे स्थलांतरित करण्याची मागणी गेल्या काही वर्षांपासून नागरिकांतून होत होती़ मात्र, हा प्रश्न शासन दरबारी पडून होता़ यासाठी माजी बांधकाम व आरोग्य सभापती विद्यमान जिल्हा परिषद सदस्य सावकार मादनाईक यांच्या प्रयत्नातून हा प्रश्न सुटला आहे़ जयसिंगपूर येथे सध्या प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू आहे़ येथे ग्रामीण रुग्णालयासाठी साडेचार कोटी रुपयांचा निधी गेल्या तीन वर्षांपासून पडून असून, त्याला गती मिळणार आहे़ येथील प्राथमिक आरोग्य केंद्र उदगाव येथे सुरू होणार आहे़ येथे ‘अ’ व ‘ब’ अशी दोन आरोग्य उपकेंद्रे असून, त्यातील एक काळम्मावाडी वसाहतीकडे स्थलांतरित होणार आहे़ तर दुसरे आरोग्य केंद्र चिंचवाड येथे स्थलांतरित करणार असल्याचे सावकार मादनाईक यांनी सांगितले़ तर उदगाव येथे होणाऱ्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या मुख्य इमारत व निवासस्थानाच्या बांधकामाकरिता जिल्हा नियोजन व विकास मंडळ यांच्याकडून तरतूद होणार आहे़ नवीन इमारत मिळेपर्यंत सध्या स्थलांतरित झालेले प्राथमिक आरोग्य केंद्र बसस्थानकाजवळ असलेल्या ‘अ’ व ‘ब’ आरोग्य केंद्रात सुरू होणार आहे़नदीपलीकडील सात गावांना आरोग्यसेवा उपलब्ध व्हावी, या हेतूने कवठेगुलंद (ता़ शिरोळ) येथे प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर झाले आहे;पण जागेअभावी ते रखडले होते़ मात्र, येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला जागा उपलब्ध झाल्याने हाही प्रश्न निकालात निघाला आहे़ (प्रतिनिधी)‘लोकमत’चा पाठपुरावा‘लोकमत’ने वेळोवेळी पाठपुरावा करून ‘जयसिंगपूर ग्रामीण रुग्णालयाची प्रतीक्षा संपेना’, ‘उदगावला प्राथमिक आरोग्य केंद्र कधी’, ‘चिंचवाड गाव आरोग्य केंद्रापासून वंचित’ अशा विविध मथळ्यांखाली वृत्त मालिका प्रसिद्ध केली होती़ आता याची प्रतीक्षा संपली आहे़ त्यामुळे नागरिकांतून ‘लोकमत’चे अभिनंदन होत आहे़