शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

उदगांव ग्रामपंचायत नव्वदीत !

By admin | Updated: April 29, 2017 00:40 IST

उदगांव ग्रामपंचायत नव्वदीत !

वर्धापनदिनाचा लोकप्रतिनिधींना विसर : मासिक सभेत चर्चा नाहीसंतोष बामणे ल्ल उदगांवसांगली-कोल्हापूर जिल्ह्याच्या सीमेवर शिरोळ तालुक्यातील उदगांव ग्रामपंचायतीच्या स्थापनेला १ मे रोजी तब्बल ९० वर्षे पूर्ण होत आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेची सत्ता असलेल्या ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांना ९० व्या वर्धापन दिनानिमित्त एकाही कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले नाही. यामुळे ग्रामस्थांतून नाराजीचा सूर उमटत आहे. स्वातंत्र्यपूर्व कालखंडात १ मे १९२७ रोजी सुमारे ३०० कुटुंब असलेल्या उदगांव गावात ग्रामपंचायत स्थापना करण्यात आली. त्यावेळी शाहूकालीन जकात नाका, छत्रपती शाहू महाराज हंगामी निवासस्थान, कलेच्या क्षेत्रातील अग्रेसर म्हणून उदगावची ओळख आहे. २०१० साली सुमारे ३० लाख खर्चून सुसज्ज ग्रामपंचायत कार्यालय बांधण्यात आले. औद्योगिक वसाहत, नळपाणी, घरफाळा कराच्या माध्यमातून चांगला महसूल ग्रामपंचायतीला मिळतो.१९७४ साली गावाची लोकसंख्या पाच हजारांच्या घरात होती. त्यावेळी उदगावच्या पहिल्या महिला सरपंच चित्राबाई देसाई यांच्या प्रयत्नातून कृष्णा नदीपात्रातून पहिली नळ पाणीपुरवठा योजना सुरू झाली.आजही या पाणीपुरवठ्यातूनच उदगावला पाणीपुरवठा होतो. तर नवीन पेयजल योजना प्रस्तावित आहे. अशा ९० वर्षांचा कालखंड असणाऱ्या पदाधिकाऱ्यांना ग्रामपंचायत वर्धापनदिनाचा विसर पडलेला दिसत आहे. सोमवारी १ मे रोजी ९० वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्ताने कोणत्याच कार्यक्रमाचे आयोजन नाही. त्यामुळे ग्रामस्थांतून नाराजी व्यक्त होत आहे. प्रबोधनाची गरजशिरोळ तालुक्यातील अग्रेसर म्हणून उदगांवची ओळख आहे. नव्वदी पार करून आणखी दहा वर्षांत शतकमहोत्सवी ग्रामपंचायत म्हणून नामोल्लेख होणार आहे. उदगांव ग्रामपंचायतीतील पदाधिकाऱ्यांची नुकतीच मासिक सभा झाली. यामध्ये वर्धापनदिनाविषयी कोणतीच चर्चा झाली नाही. त्यामुळे सोमवारी (दि.१मे) ग्रामपंचायतीच्या वर्धापनदिनानिमित्त कार्यक्रम आयोजन्याची गरज आहे. असे आहे उदगांव... १ मे १९२७ रोजी ग्रामपंचायतीची स्थापना झाली आहे. उदगांवचे कार्यक्षेत्र मोठे असल्याने छत्रपती शाहू महाराजांनी पर्यायी बाजारपेठ म्हणून जयसिंगपूर शहर वसवून नगरपालिका स्थापन केली. उदगांव येथील काळम्मावाडी वसाहतीत स्वतंत्र ग्रामपंचायत प्रस्तावित आहे. त्यामुळे ही ग्रामपंचायत लवकरच होण्याची शक्यता आहे. मात्र, उदगांवच्या विकासाला आजही पूर्ण क्षमतेने चालना मिळाली नाही. सध्याच्या लोकसंख्येच्यादृष्टीने नगरपंचायत किंवा नगरपालिका शासनाच्या नियमानुसार स्थापन होऊ शकते.