शहरं
Join us  
Trending Stories
1
मुलगा शिवसेनेचा आमदार! नारायण राणे म्हणतात, बाळासाहेब होते तोपर्यंतच शिवसेना होती, आजची...
2
निवडणूक बिहारमध्ये, चर्चा महाराष्ट्राच्या एकनाथ शिंदेंची; एनडीएला डिवचण्यासाठी विरोधकांकडून 'शिंदे मॉडेल'चा उल्लेख
3
ट्रम्प यांनी केलेला युद्धविराम हमासने तोडला की इस्रायलने? हवाई हल्ले, रणगाड्यांच्या तोफांनी गाझा हादरला, १८ ठार
4
क्रूरतेची सीमा ओलांडली! श्वास थांबेपर्यंत चिमुकल्याचा गळा दाबला; मृतदेह घाटावर फेकला! मन सुन्न करणारी घटना!
5
सोने-चांदीचे दर कोसळले! विक्रमी उच्चांकावरून सोने १३,०००, तर चांदी २९,००० रुपयांपर्यंत स्वस्त
6
सौरभ चौघुलेपासून विभक्त झाल्याच्या चर्चांवर अखेर योगिता चव्हाणनं सोडलं मौन, म्हणाली...
7
रश्मिका मंदानाला व्हायचंय आई, आतापासूनच पडली प्रेमात; म्हणाली, "ठराविक वयात..."
8
प्रकट दिन २०२५: स्वामी अन् शंकर महाराजांची भेट कशी झाली? ब्रह्मांडनायक गुरुचा अद्भूत शिष्य
9
Video - "मी तुमच्या मुलीवर उपचार करणार नाही..."; डॉक्टरची रुग्णाच्या वडिलांना मारहाण
10
Vastu Shastra: वास्तु शास्त्रानुसार घराच्या 'या' भागात ठेवा मोरपीस, आयुष्यात भरतील नवे रंग!
11
मायक्रोसॉफ्टने नोकियानंतर या कंपनीवर तगडा पैसा लावला; Ai च्या इतिहासातील सर्वात मोठी डील, फळणार का?
12
प्रकट दिन: कैलास का रहनेवाला, स्वामींचे दैवी परमशिष्य; विलक्षण अवलिया असलेले शंकर महाराज
13
१३८ दिवसांनी शनि मार्गी: ७ राशींची चंगळ, वरदानाचा काळ; यश-पैसा, सुख लाभेल, साडेसाती संपेल?
14
पाकिस्तान क्रिकेटमध्ये मोठ्ठा राडा !! मोहम्मद रिझवान पाक क्रिकेट बोर्डाला नडला... काय घडलं?
15
किरकोळ तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात; सेन्सेक्स ८५,००० अंकांच्या आणि निफ्टी २६,००० अंकांच्या जवळ
16
PPF ला साधं समजू नका! पती-पत्नी मिळून बनवू शकता ₹१.३३ कोटींचा फंड, तोही टॅक्स फ्री
17
'तो' प्रवास ठरला शेवटचा! कुटुंबीयांसमोरच वडील आणि मुलीचा होरपळून मृत्यू; १० जण जखमी
18
ब्राझीलमध्ये रेड कमांडोविरोधात युद्ध सुरु; रिओमध्ये मोठ्या अड्ड्यावर हेलिकॉप्टरद्वारे हल्ला, माफियांकडून ड्रोन हल्ल्याने प्रत्यूत्तर
19
भयानक! ब्राझीलच्या रियो डी जेनेरियोमध्ये पोलीस कारवाईत ६४ जणांचा मृत्यू, ८१ जणांना अटक
20
Ramkesh Murder Case: बदल्याची आग! मोबाईल डेटा, हार्ड ड्राइव्ह, अश्लील...; २० वर्षीय मुलीने का केली पार्टनरची हत्या?

Lok Sabha Election 2019 उदयसिंगराव गायकवाड यांचे मताधिक्याचे रेकॉर्ड २८ वर्षे अबाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2019 00:39 IST

राजाराम लोंढे । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात १९९१ च्या निवडणुकीत कॉँग्रेसचे उदयसिंगराव गायकवाड यांनी त्यांचे ...

राजाराम लोंढे ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात १९९१ च्या निवडणुकीत कॉँग्रेसचे उदयसिंगराव गायकवाड यांनी त्यांचे निकटचे प्रतिस्पर्धी शिवसेनेचे रामचंद्र फाळके यांच्यावर १ लाख ९१ हजार ३३१ इतक्या मताधिक्याने विजय मिळवला होता. १९७१ पासूनच्या निवडणुकीतील हे सर्वाधिक मताधिक्य असून, गेल्या २८ वर्षांत हे रेकॉर्ड अबाधित आहे.कोल्हापूर मतदारसंघ हा कॉँग्रेसचा बालेकिल्ला होता. शेतकरी कामगार पक्षाचे त्यांना तगडे आव्हान राहिले. सन १९७७ च्या निवडणुकीचा अपवाद वगळता या मतदारसंघावर कॉँग्रेस आणि त्या विचारसरणीचा उमेदवार कमी-अधिक मतांनी विजयी झाला आहे. उदयसिंगराव गायकवाड हे १९८० पासून कॉँग्रेसच्या उमेदवारीवर रिंग्ांणात उतरले. त्यांनी पहिल्याच लढतीत १ लाख ५४ हजार ४४३ इतक्या मताधिक्याने ‘शेकाप’चे दाजीबा देसाई यांचा पराभव केला. तेथून पुढे पाचवेळा त्यांनी ‘कोल्हापूर’चे प्रतिनिधित्व केले. पाच टर्ममध्ये १९९१ मध्ये तब्बल १ लाख ९४ हजार ३३१ इतक्या मताधिक्याने विजयी मिळवला. त्यावेळी गायकवाड यांना ४ लाख ११ हजार ७५ मतांपैकी २ लाख ६९ हजार ५०८ मते मिळाली होती. त्यांचे निकटचे प्रतिस्पर्धी शिवसेनेचे रामचंद्र फाळके यांना ७५ हजार १७७ मते मिळाली होती. गायकवाड यांचे हे रेकॉर्ड २८ वर्षे अबाधित आहे.कोणाला किती होते मताधिक्यवर्ष नाव मताधिक्य१९७१ राजाराम निंबाळकर १,०७,६६४१९७७ दाजीबा देसाई १६५१९८० उदयसिंगराव गायकवाड १,५४,४४३१९८४ उदयसिंगराव गायकवाड १,४९,४७४१९८९ उदयसिंगराव गायकवाड ४१,१२८१९९१ उदयसिंगराव गायकवाड १,९१,३३११९९६ उदयसिंगराव गायकवाड ६८,३२५१९९८ सदाशिवराव मंडलिक ६१,५९८१९९९ सदाशिवराव मंडलिक १,०८,९१०२००४ सदाशिवराव मंडलिक १४,७५३२००९ सदाशिवराव मंडलिक ४४,८००२०१४ धनंजय महाडिक ३३,२५९165 एवढ्या कमी मताधिक्याने दाजीबा देसाई यांना १९७७ मध्ये विजय मिळाला होता. १९७७ ला ‘शेकाप’चे देसाई व कॉँग्रेसचे शंकरराव माने यांच्यात लढत झाली. अपक्ष शामराव माळी यांनी २१०९ मते घेतली.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक