यावेळी सचिन घोरपडे म्हणाले, इतके दिवस शांतपणे सुरू असलेल्या आंदोलनाने आता रौद्ररूप धारण केल्याचे दिसत आहे. एमएसपी, बाजार समित्यांचं अस्तित्व आणि कंत्राटी शेती हे मुद्दे प्रामुख्याने आंदोलनाच्या केंद्रस्थानी आहेत. त्यामुळे शेतकरीविरोधी हे तिन्ही कायदे पूर्णपणे मागे घेतले पाहिजेत.
यावेळी लाक्षणिक उपोषणाला ‘बिद्री’चे माजी संचालक प्रकाशराव देसाई, सुरेश नाईक, भुजंगराव मगदूम, सदाशिव पाटील, अमोल पाटील, प्रतीक लिंकर, सचिन देसाई, धोंडीराम मांगले, शिवाजी पाटील, धनाजी कुरळे आदी उपस्थित होते.
फोटो ओळ -
गारगोटी येथे लाक्षणिक उपोषणप्रसंगी कोल्हापूर जिल्हा बाजार समितीचे सदस्य सचिन घोरपडे, तालुकाध्यक्ष श्यामराव देसाई, शंभुराजे देसाई, माजी सरपंच राजू काझी, धनाजी कुरळे आदी