शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

ऊर्जामंत्र्यांचा सल्ला जबाबदारी झटकण्याचा प्रकार

By admin | Updated: March 19, 2015 00:10 IST

वीजदर सवलत प्रकरण : वस्त्रोद्योगातील उद्योजकांचा नाराजीचा सूर

राजराम पाटील - इचलकरंजी ऊर्जा नियामक आयोगाकडे वाढीव वीजदराबाबत यंत्रमागधारकांच्या संघटनांनी वारंवार म्हणणे मांडले असले, तरी दरवाढ रद्द झालेली नाही. तसेच गेल्या दहा वर्षांत स्वतंत्र वर्गवारी मिळाली नाही, अशा पार्श्वभूमीवर ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा आयोगाकडे जाण्याचा सल्ला म्हणजे शासनाने हात झटकण्याचाच प्रकार आहे. परिणामी वस्त्रोद्योगात नाराजीचा सूर आहे.दहा वर्षांपूर्वी वीज कायदा अस्तित्वात आला. वीजदर निश्चिती आणि विजेबाबत निर्माण होणाऱ्या वाद-तक्रारींचे निवारण करण्याचे अधिकार महाराष्ट्र ऊर्जा नियामक आयोगाकडे गेले. वीज दरवाढ किंवा तत्सम प्रकरणांच्या सुनावण्या दरवर्षी फेब्रुवारी-मार्च महिन्यांत आयोगासमोर चालतात. त्याप्रमाणे यंत्रमागधारक व वीज ग्राहक संघटना यंत्रमागासाठी स्वतंत्र वर्गवारीची मागणी वारंवार करते; पण आयोगाने त्याकडे दुर्लक्ष केले आहे.त्याचबरोबर वीज दरवाढीच्या महावितरण कंपनीच्या प्रस्तावावर आयोगासमोर अनेक सुनावण्या झाल्या. प्रत्येक सुनावणीवेळी वीज निर्मितीतील भ्रष्टाचार, गळतीच्या नावाखाली लपलेली वीजचोरी, पूर्ण क्षमतेत न होणारे वीज उत्पादन, आदी मुद्दे ग्राहक संघटनांनी आयोगासमोर मांडले; पण शेवटी वीज दरवाढीला मंजुरी दिली गेली, असे कटू अनुभव वीज ग्राहकांना नेहमीच येतात. त्याच आयोगाकडे पुन्हा जाण्याचा सल्ला ऊर्जामंत्र्यांनी दिल्याने यंत्रमागधारकांना आश्चर्य वाटत आहे. (उत्तरार्ध)ऊर्जामंत्र्यांच्या दालनात सोमवारी (१६ मार्च) झालेली बैठक म्हणजे मॅच फिक्सिंग होती. यंत्रमागाला स्वतंत्र वर्गवारी देऊन शासनाने यंत्रमाग उद्योगाला विजेच्या दरात सवलत द्यावी. विजेचे दर किमान पाच वर्षे स्थिर ठेवावेत.- गोरखनाथ सावंत, अध्यक्ष - इचलकरंजी शटललेस लूम ओनर्स असोसिएशन.यंत्रमागासाठी स्वतंत्र वर्गवारी व वीजदर सवलत देण्यास शासनाची अनुकूलता आहे; पण वर्गवारी ठरविण्याचे अधिकार ऊर्जा नियामक आयोगाला आहेत, असे ऊर्जामंत्र्यांचे म्हणणे आहे. वीजदराची सवलत स्थिर असावी. - दीपक राशिनकर, अध्यक्ष - कोल्हापूर जिल्हा पॉवरलूम असोसिएशन.यंत्रमागासाठी कृषीपंपाप्रमाणे स्वतंत्र वर्गवारी असलीच पाहिजे. ऊर्जा आयोगाकडे तशी मागणी सातत्याची आहे. पूर्वीचाच सवलतीचा वीजदर मिळावा. याचा निर्णय शासनानेच केला पाहिजे.- सतीश कोष्टी, अध्यक्ष - इचलकरंजी पॉवरलूम विव्हर्स असोसिएशन.