शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

मामाला भेटून परत येताना मांजरेचे दोन युवक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:30 IST

मलकापूर : करंजपेण - येळवण जुगाई मार्गावरील मोसम गावच्या हद्दीतील रस्त्यात थांबलेल्या डंपरला धडकून झालेल्या अपघातात मांजरे, ता. ...

मलकापूर : करंजपेण - येळवण जुगाई मार्गावरील मोसम गावच्या हद्दीतील रस्त्यात थांबलेल्या डंपरला धडकून झालेल्या अपघातात मांजरे, ता. शाहूवाडी येथील दोन युवक जागीच ठार झाले. मृत झालेल्या युवकाची नावे अशी, बाळासाहेब लहू भातडे (वय २०), सचिन बाळकृष्ण शेलार (वय २२). ही घटना रात्री ७.३० वाजता घडली असून, याची नोंद शाहूवाडी पोलिसांत झाली आहे.

अपघाताबाबत शाहूवाडी पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, बाळासाहेब भातडे व सचिन शेलार हे दोघे करंजपेण या गावी बाळासाहेबाच्या मामाला भेटण्यासाठी मोटारसायकल क्रमांक (एम एच ०९ - ए - ३६२४) वरून गेले होते. बाळासाहेब स्वत: मोटारसायकल चालवित होते. मामाला भेटून झाल्यानंतर हे दोघे करंजपेण - येळवण जुगाई रस्त्यावरून मांजरे गावाकडे येत होते. मोटारसायकल मोसम गावच्या हद्दीत आल्यावर मोसम गावात रस्त्याकडेला बंद असलेल्या डंपर क्रमांक (एम एच १० - सी. आर. ९७७२) वर मोटारसायकल जोरात धडकली. यामध्ये बाळासाहेब व सचिन या दोघांचा जागीच मृत्यू झाला. दोघांच्या डोक्याला गंभीर जखम झाली होती. अपघाताची माहिती मांजरे गावात समजताच नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली होती. मृत बाळासाहेब व सचिन या दोघांचे मृतदेह मलकापूर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आले होते. वैद्यकीय अधिकारी यांनी मृतदेहांचे शवविच्छेदन केल्यावर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले. रात्री उशिरा दोघांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. बाबासाहेब यांचे शिक्षण पदवीपर्यंत झाले होते, तर सचिन हा हॉटेल कामगार होता. सचिन आई-वडिलांना एकुलता एक होता. या दोन युवकांच्या मृत्यूने मांजरे गावावर शोककळा पसरली आहे.

॥ हेल्मेट असते तर जीव वाचला असता ॥

बाळासाहेब व त्याचा मित्र सचिन हे दोघे बाळासाहेबांच्या मामाला भेटायला गेले होते. बाबासाहेब मोटारसायकल चालवित होते. दोघांच्याही डोक्यावर हेल्मेट नव्हते, जर हेल्मेट असते तर जीव वाचला असता.

फोटो

बाळासाहेब भातडे

सचिन शेलार