शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

लिपिकास दोन वर्षे सक्तमजुरी

By admin | Updated: April 1, 2016 01:31 IST

दोनशेची लाच : शाहूवाडी तहसीलचे प्रकरण

कोल्हापूर : जमिनीचा ७/१२ उतारा देण्यासाठी दोनशे रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी शाहूवाडी तहसील कार्यालयातील लिपिकास जिल्हा व सत्र न्यायालय क्रमांक दोन न्यायाधीश के. डी. बोचे यांनी दोन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा गुरुवारी ठोठावली. भगवंत तुकाराम चांदेकर (वय ३७, सध्या राहणार गणेश कॉलनी, शाहूवाडी, जि. कोल्हापूर, मूळ गाव पिंपळापूर, ता. राळेगाव, जि. यवतमाळ) असे शिक्षा झालेल्या लिपिकाचे नाव आहे.या खटल्याची पार्श्वभूमी अशी की, बहिरेवाडी (ता. शाहूवाडी) येथील सुरेश जगन्नाथ खोत यांची त्यांच्या वडिलांचे नावे असलेली गट नंबर ४०९ मध्ये ३० गुंठे जमीन होती. या जमिनीचे ७/१२ उताऱ्याचे १९७५ पासून ते २००० पर्यंतचे उतारे त्यांना पाहिजे होते. खोत यांनी शाहूवाडीच्या तहसीलदार कार्यालयात सातबारा उताऱ्याबाबत चौकशी केली. त्यावेळी लिपिक भगवंत चांदेकर याने ‘उद्या तुम्हाला पाहिजे असलेल्या सातबारा उताऱ्याबाबतचा अर्ज घेऊन या’ असे सांगितले. त्यानंतर ६ मार्च २०१४ रोजी उतारे मागणीबाबतचा अर्ज घेऊन खोत चांदेकर याच्याकडे गेले. ‘सदरचे उतारे मी तुम्हाला देतो; परंतु त्यासाठी मला ५०० रुपये द्यावे लागतील’ असे सांगून ‘त्याबाबतचा अर्ज देऊन तुम्ही माझ्याकडे या’ असे सांगितले होते.त्यानंतर खोत यांनी कोल्हापुरातील शनिवार पेठेमधील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयाकडे याच दिवशी तक्रार दिली. त्यानुसार दुसऱ्या दिवशी तक्रारीस अनुसरून त्याची पडताळणी करण्याचे आयोजन केले. पण चांदेकर हा न्यायालयीन कामासाठी कोल्हापूरला गेला होता. त्यानंतर १० मार्च रोजी चांदेकर याने एका पांढऱ्या रंगाच्या कागदावर २०० असा आकडा लिहून लाचेची मागणी केली. खोत यांच्याकडून २०० रुपयांची लाच घेत असताना भगवंत चांदेकर याला सापळा रचून शाहूवाडी तहसीलदार कार्यालयामध्ये पकडले. याची नोंद शाहूवाडी पोलिस ठाण्यात झाली होती.याचा तपास पोलिस उपअधीक्षक उदय आफळे, निरीक्षक व्ही. एस. घोरपडे यांनी केला. यामध्ये तत्कालीन जिल्हाधिकारी राजाराम माने, फिर्यादी सुरेश खोत,आदींच्या साक्षी महत्त्वपूर्ण ठरल्या. भगवंत चांदेकर याला कलम सात खाली एक वर्ष सक्तमजुरी व पाच हजार रुपये दंड अशी शिक्षा के. डी. बोचे यांनी ठोठावली. सहायक सरकारी वकील म्हणून ए. एम. पीरजादे यांनी काम पाहिले.दरम्यान, भगवंत चांदेकर याने न्यायालयाकडे जामिनासाठी अर्ज केला.