पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, जवाहरनगरातील दत्तात्रय कृष्णाजी जोशी (वय ६८, रा. सहस्रार्जुन पार्क) यांनी मोपेड आपल्याच इमारतीच्या पार्किंगमध्ये उभी करून ते दि. १ नोव्हेंबर २०२० ते ४ जानेवारी २०२१ या कालावधीत बाहेरगावी गेले होते. त्या कालावधीत चोरट्यांनी त्यांच्या मोपेडचे लॉक तोडून अथवा बनावट चावीचा वापर करून ती चोरून नेली. याबाबत त्यांनी राजारामपुरी पोलीस ठाण्यात चोरीची फिर्याद दाखल झाली होती. हीच मोपेड गणेश हिरासकर या संशयित चोरट्याकडे मिळून आली. पोलिसांनी त्याला अटक करून त्याच्याकडून चोरीची मोपेड जप्त केली. त्याला न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. संशयित चोरट्याकडून दुचाकी चोरीचे आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली.
फोटो नं. २००१२०२१-कोल-गणेश हिरासकर (आरोपी)