शहरं
Join us  
Trending Stories
1
त्रिभाषा समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव यांनी स्पष्ट केली भूमिका; राज ठाकरेंबद्दल म्हणाले...
2
जगातील या 5 देशांमध्ये राहतात सर्वाधिक हिंदू! टॉप टेनमध्ये 3 मुस्लीम देशांचाही समावेश, चकित करणारी आहे आकडेवारी
3
दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले; म्हणाले, “गेल्या ५ वर्षांत ठराविक लोक...”
4
लुटेरी दुल्हन! नवऱ्याला भाऊ बनवलं अन् दुसरं लग्न केलं; रोख रक्कम, दागिने घेऊन झाली पसार
5
एकाच ताटात किती जण जेवतात? शिवभोजन थाळी लाभार्थ्यांचा हा व्हिडीओ बघितला का?
6
आत्महत्या की हत्या? डॉक्टर महिलेच्या मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी करा- उपसभापती नीलम गोऱ्हे
7
पाकिस्तानी संघ भारतात येणार, आशिया कप खेळणार; केंद्र सरकारची परवानगी
8
"...म्हणून मी 'चला हवा येऊ द्या'मधून बाहेर पडलो", अखेर निलेश साबळेने सांगितलं खरं कारण
9
Viral Video : समुद्राची खोली दाखवण्यासाठी पाकिस्तानी पत्रकाराने काय केलं बघाच! तुम्हालाही हसू आवरणार नाही
10
छत्री तलाव येथे वाढदिवस साजरा करणाऱ्या तरुणाला 'भुता'कडून मारहाण? व्हिडीओ व्हायरल; पोलिस म्हणतात...
11
'आमच्या भारतात २५०० राजकीय पक्ष...', PM मोदींनी आकडा सांगताच घानातील सर्व नेते चक्रावले
12
कोण असतील पुढचे दलाई लामा? भारताने स्पष्ट शब्दात उत्तर दिलं; चीनलाही थेट सुनावलं! म्हणाले... 
13
२०२५मध्ये आतापर्यंत कोणत्या देशाने सर्वाधिक शस्त्रे खरेदी केली? यादीत भारताचा क्रमांक कितवा?
14
Criminal Justice 4: ‘माधव मिश्रा’ची साधी भोळी पत्नी, खऱ्या आयुष्यात 'फॅशन क्वीन' आहे खुशबू अत्रे ( PHOTOS )
15
भय इथले संपत नाही! तांदळामुळे कॅन्सरचा मोठा धोका? 'हा' राईस आहे सर्वात सुरक्षित
16
निलेश साबळेपाठोपाठ 'चला हवा येऊ द्या'मधून भाऊ कदमचीही एक्झिट, नेमकं कारण तरी काय?
17
अपात्र, दोषी लाडक्या बहि‍णींना पैसे परत द्यावे लागणार?; अदिती तटकरेंनी विधानसभेत काय सांगितले?
18
बाजारात सलग दुसऱ्या दिवशी 'रेड अलर्ट'! 'ही' आहेत ३ मोठी कारणे; घसरणीतही 'या' शेअर्सने मारली बाजी
19
Ashadhi Ekadashi 2025: पांडुरंगाच्या मूर्तीवर शिवलिंग का आहे? अनेकांना माहीत नाही कारण!
20
"डच्चू दिला, अहंकार, चॅनेलने बाहेर काढलं...", राशीचक्रकार शरद उपाध्येंच्या आरोपांवर निलेश साबळेनं सोडलं मौन, म्हणाला...

‘एव्हीएच’ कामगारांची दोन वाहने पेटविली

By admin | Updated: June 3, 2015 01:11 IST

१५ कामगार जखमी : अज्ञात हल्लेखोरांकडून हल्ला

चंदगड : हलकर्णी (ता. चंदगड) येथील ‘एव्हीएच’ प्रकल्पात काम करणाऱ्या कामगारांना बेळगाव-वेंगुर्ला रस्त्यावरील सुपे फाट्यानजीक अज्ञात हल्लेखोरांनी वाहने अडवून बेदम मारहाण केली व गाड्यांवर दगडफेक करून दोन वाहने पेटविली. हल्लेखोरांनी तोंडावर मास्क करून ट्रॅकसूट घातली होती. वाहन पेटवून हल्लेखोर उसातून पसार झाले. ही घटना मंगळवारी सायंकाळी सात वाजता घडली.सात मार्च रोजी आंदोलकांनी एव्हीएच कंपनीची जाळपोळ केली होती. जनभावनेचा आदर करून राज्य शासनाने कंपनीच्या उत्पादनाला स्थगिती दिली. पण, गेल्या आठ-दहा दिवसांपासून जाळपोळीत नुकसान झालेल्या मशिनरींची दुरुस्ती करण्यात येत होती. यासाठी बेळगावहून पोलीस बंदोबस्तात कामगारांना आणणे व सोडण्याचा दिनक्रम सुरू होता. मंगळवारी सायंकाळी सात वाजता काम आटोपल्यानंतर कामगारांना घेऊन तीन गाड्या बेळगावला जात होत्या. यासोबत पोलीस गाडीही होती. सुपे आरटीओ नाक्यानजीक या कामगारांच्या गाड्यांना सोडून राहिलेल्या कामगारांना आणण्यासाठी पोलीस गाडी परत गेली. याचा फायदा घेऊन दोन वाहनांवर दगडफेक केली. तिसऱ्या वाहनधारकाने परिस्थितीचे गांभीर्य ओळखून गाडी परतून लावली. या वाहनातील कामगारांना हल्लेखोरांनी बाहेर काढून मारहाण केली. काही कामगार हल्लेखोरांचे मोबाईलवर फोटो घेण्याचा प्रयत्न करत होते. त्यावेळी हल्लेखोरांनी कामगारांचे मोबाईल काढून घेऊन पुन्हा मारहाण केली. त्यामुळे भयभीत कामगार वाट मिळेल त्या दिशेने पळत सुटले. १० मिनिटांतच पोलीस दाखल झाले. परंतु हल्लेखोरांनी पलायन केले. बेळगाव-वेंगुर्ला रस्त्यावर वाहने पेटत असल्याने या मार्गावरील २ तास वाहतूक ठप्प झाली. जखमींची नावे रात्री उशिरापर्यंत समजली नाहीत. हल्लेखोरांनी फक्त दहा मिनिटांतच दोन वाहने पेटवल्याने या हल्ला पूर्वनियोजित असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. तपास पोलीस निरीक्षक अंगद जाधवर, पोलीस उपनिरीक्षक शरद माळी करीत आहेत. (प्रतिनिधी)आंदोलनाला बदनाम करण्याचा प्रयत्न : बाभूळकरकोल्हापूर येथे मागील आठवड्यातच मुख्यमंत्री, जिल्हाधिकारी यांच्यासमवेत एव्हीएच संदर्भात बैठक झाली होती. या बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांनी उच्चस्तरीय समिती नेमून एव्हीएच कंपनीची चौकशी करणार असून, त्याचा अहवाल येईपर्यंत कंपनीला दिलेली स्थगिती उठविणार नसल्याचे आश्वासन मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले होते. त्यामुळे समितीचा अहवाल येईपर्यंत कोणतेही आंदोलन करणार नसल्याचे आश्वासन दिले होते. त्यामुळे मंगळवारी झालेली घटना आमच्या आंदोलनाला बदनाम करण्याचा प्रयत्न असल्याचे डॉ. नंदिनी बाभूळकर यांनी सांगितले.कोल्हापुरातील बैठकीत कृती समितीला मुख्यमंत्री फडणवीस यांनी निरीची उच्चस्तरीय समिती नेमून एव्हीएच कंपनीची चौकशी करणार असल्याचे आश्वासन दिले होते. समितीचा अहवाल येईपर्यंत आंदोलन करणार नाही, असे कृती समितीमध्ये ठरले. लोकशाही मार्गाने आंदोलन करत असतानाच ही घटना आंदोलनाला गालबोट लावणारी आहे. हा पूर्वनियोजित कट का असू नये, असे सांगून या घटनेचा निषेध करत असल्याचे कृती समितीचे अ‍ॅड. संतोष मळवीकर यांनी सांगितले.घटनाक्रम २५ जानेवारी २०१३ - कंपनीची जाळपोळ २७ मे २०१३ - जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलकांचा हल्ला ७ मार्च २०१५ - कंपनीची पुन्हा जाळपोळ९ मार्च २०१५ - सुपेनजीक एका वाहनाची जाळपोळ २ जून २०१५ - सुपेनजीक दोन वाहनांची जाळपोळ व कामगारांना मारहाण