शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

दोघा अट्टल घरफोड्यांना अटक

By admin | Updated: August 31, 2014 00:28 IST

पाच घरफोड्यांची कबुली : तीन लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत

कोल्हापूर : शहरासह उपनगरांत घरफोडी करून धुमाकूळ घालणाऱ्या अट्टल दोघा घरफोड्यांना आज, शनिवार लक्ष्मीपुरी पोलिसांनी अटक केली. संशयित आरोपी लखन ऊर्फ अस्लम राजेसाब किल्लेदार (वय २४), जुबीर ऊर्फ दाद्या आयुब किल्लेदार (१९, दोघे रा. राजेंद्रनगर झोपडपट्टी) अशी त्यांची नावे आहेत. पोलिसांनी त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी पाच घरफोड्यांची कबुली दिली. त्यांच्याकडून सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह मोटारसायकल, एलसीडी, लॅपटॉप, मॉनिटर असा सुमारे तीन लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला. लक्ष्मीपुरीचे पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे यांना संशयित लखन किल्लेदार व जुबीर किल्लेदार हे दोघे घरफोड्या करीत असून, त्यांच्या घरी चोरीचे साहित्य आहे, अशी माहिती खबऱ्याद्वारे मिळाली. त्यांनी गुन्हे शाखेच्या पथकाला कारवाईचे आदेश दिले. पोलिसांनी आज दुपारी बाराच्या सुमारास या दोघांच्या घरी छापा टाकून त्यांना पकडले. तसेच चोरीचे साहित्यही हस्तगत केले. त्यांनी लक्ष्मीपुरीसह शाहूपुरी व करवीर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये चोऱ्या केल्याची कबुली दिली. त्यापैकी पाच घरफोड्यांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला. दोघेही घरफोड्या करण्यामध्ये पटाईत आहेत. लोखंडी सळीने कडी-कोयंडा उचकटून तसेच घराजवळील झाडावरून गॅलरीत उतरून दरवाजाची काच फोडून मुद्देमाल लुटत होते. (प्रतिनिधी)