शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

ट्रॅक्टरला धडकून दोघे विद्यार्थी ठार

By admin | Updated: February 24, 2016 01:04 IST

साखरी येथील घटना : शाळेतून घरी परतताना सायकलवरील नियंत्रण सुटल्याने अपघात

गगनबावडा : शाळा सुटल्यानंतर घरी जाताना ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरला सायकल धडकून झालेल्या अपघातात दोन विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला. अविनाश रंगराव पाटील (वय १३, रा. म्हाळुंगे) आणि पृथ्वीराज भरत सूर्यवंशी (वय १४, रा. तिसंगी पैकी बालेवाडी) अशी त्यांची नावे आहेत. साखरी येथील घाटगे वसाहती समोरील वळणावर मंगळवारी सकाळी ९.४५ च्या दरम्यान हा अपघात झाला. याबाबत सरपंच नामदेव चौगले यांनी साळवण पोलिसांत वर्दी दिली.याबाबतची अधिक माहिती अशी, मंगळवारी सकाळी शाळा सुटल्यानंतर पृथ्वीराज सूर्यवंशी हा अविनाशला सोडण्यासाठी सायकलवरून जात होता. कोल्हापूर-गगनबावडा राज्यमार्गावर साखरी व तिसंगीच्या दरम्यान घाटगे वसाहती समोरील वळणावर त्याचे सायकलवरील नियंत्रण सुटल्याने ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरला त्याची सायकल धडकली. त्यामुळे अविनाश हा ट्रॉलीच्या चाकाखाली सापडल्याने जागीच ठार झाला. तर रस्त्यावर जोरात डोके आपटल्याने पृथ्वीराजचा मृत्यू झाला.दहावीच्या विद्यार्थ्यांचा सदिच्छा समारंभ कार्यक्रम असल्याने दत्ताजीराव मोहिते-पाटील माध्यामिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय सकाळीच सोडण्यात आले होते. अविनाश हा सातवीत, तर पृथ्वीराज हा आठवीत शिकत होता.अपघाताची बातमी समजताच शाळकरी विद्यार्थ्यांसह परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. मृतदेह बंकट थोडगे यांच्या अ‍ॅम्ब्युलन्समधून कोल्हापूर येथील सीपीआरमध्ये नेण्यात आले. सकाळी हसत खेळत गेलेली मुले रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे चित्र बघितल्याने सर्व नातेवाईक आक्रोश करीत होते. घटनास्थळी प्रभारी तहसीलदार रावसाहेब चाटे यांनी भेट दिली.अपघात झालेल्या वळणावरती रस्ता उताराचा असल्यामुळे सायकलवरील नियंत्रण सुटल्यानेच अपघात झाल्याची चर्चा होती.अपघाताची नोंद गगनबावडा पोलीस ठाण्यात झाली आहे.