शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

‘दौलत’साठी ‘न्यूट्रीअन्स’चे दोन प्रस्ताव

By admin | Updated: April 26, 2016 00:39 IST

६० वर्षांचा प्रस्ताव : ४० वर्षांसाठी पार्र्टिकल बोर्डच नको, शुक्रवारच्या बैठकीत निर्णय

कोल्हापूर : हलकर्णी (ता. चंदगड) येथील दौलत शेतकरी सहकारी साखर कारखाना भाडेतत्त्वावर चालविण्यास घेण्यासाठी न्यूट्रीअन्स अ‍ॅग्रो अँड फूड प्रा. लि. गोकाक यांनी निविदाद्वारे जिल्हा बॅँकेला ४० व ६० वर्षांचे दोन प्रस्ताव दिले आहेत. मार्च २०१७ अखेर जिल्हा बॅँकेचे २३ कोटी देऊन उर्वरित रक्कम टप्प्याटप्प्यांने देण्याचा प्रस्ताव असून, यावर शुक्रवारी (दि. २९) बॅँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत निर्णय होणार आहे. ‘दौलत’च्या ६७ कोटी थकीत कर्जासाठी बॅँकेने नवव्यांदा भाडेतत्त्वावर चालविण्यास देण्यासाठी निविदा प्रसिद्ध केली होती. यामध्ये केवळ ‘न्यूट्रीअन्स’ने एक कोटी बयाणा रकमेसह सोमवारी निविदा दाखल केली. दुपारी चार वाजता बॅँकेने निविदा उघडली, यामध्ये ‘न्यूट्रीअन्स’ने ४० व ६० वर्षे भाडेतत्त्वावर चालविण्यास घेण्यास तयार असल्याचे प्रस्ताव दिले. ६० वर्षे करारात ‘एनसीडीसी’ व ‘एसडीएफ’ या दोन वित्तीय संस्थांचे पैशाबाबत बँकेने पुढाकार घेऊन हप्ते ठरवून द्यावेत. ४० वर्षे करारात ‘एनसीडीसी’चे कर्ज असलेला पार्टिकल बोर्ड सोडून उर्वरित प्रकल्प भाडेतत्त्वावर घेण्याची तयारी कंपनीने दाखविली आहे. जिल्हा बॅँकेच्या ६७ कोटींपैकी २३ कोटी मार्च २०१७ अखेर देण्याची तयारी दर्शविली आहे. शासकीय नियमाप्रमाणे कारखान्याचे भाडे व बॅँकेचे उर्वरित कर्ज देऊ, असेही या प्रस्तावात कंपनीने म्हटले आहे. याबाबत जिल्हा बॅँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत निर्णय घेतला जाणार आहे. (प्रतिनिधी)बँकेची लपवाछपवी!‘दौलत’ची निविदा प्रसिद्ध झाल्यापासून बॅँकेने कमालीची गुप्तता पाळली. किती निविदांची विक्री झाली, याबाबत प्रसारमाध्यमांना चुकीची माहिती दिली. निविदा उघडल्यानंतरही बँकेच्या उपाध्यक्षांनी सांगूनही अधिकाऱ्यांनी माहिती देण्यास टाळाटाळ केली. अध्यक्ष तुम्हाला माहिती देतील, असे सांगितले, बॅँकेच्या या लपवाछपवीमागे नेमके गौडबंगाल काय ? याची चर्चा सुरू आहे.