शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर जिल्ह्यातून दोन खासदार, दहा आमदार ‘भाजप’चेच असतील: चंद्रकांत पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2018 00:13 IST

भादोले : केंद्र व राज्यात सत्ता असलेला भारतीय जनता पक्ष विकासकामे आणि विविध योजनांच्या माध्यमातून घराघरांपर्यंत पोहोचला आहे. आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत कोल्हापूर जिल्ह्यातून भाजपचे दोन खासदार व दहा आमदार निवडून येतील, असा विश्वास चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला.वाठार तर्फ वडगाव (ता. हातकणंगले) येथे भाजपचे हातकणंगले तालुक्यातील बूथ प्रमुख, ...

भादोले : केंद्र व राज्यात सत्ता असलेला भारतीय जनता पक्ष विकासकामे आणि विविध योजनांच्या माध्यमातून घराघरांपर्यंत पोहोचला आहे. आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत कोल्हापूर जिल्ह्यातून भाजपचे दोन खासदार व दहा आमदार निवडून येतील, असा विश्वास चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला.वाठार तर्फ वडगाव (ता. हातकणंगले) येथे भाजपचे हातकणंगले तालुक्यातील बूथ प्रमुख, पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या मेळावा उत्साहात झाला, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी प्रमुख उपस्थित आमदार सुरेश हाळवणकर, जिल्हाध्यक्ष हिंदुराव शेळके, संघटनमंत्री बाबा देसाई, सभापती रेश्मा सनदी, दलितमित्र अशोकराव माने, हुपरीच्या नगराध्यक्षा जयश्री गाठ, उपनगराध्यक्ष जयकुमार माळगे, वडगावचे नगराध्यक्ष मोहनलाल माळी, जिल्हा उपाध्यक्ष डॉ. अशोक चौगुले, सतीश घाटगे, आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले, जिल्ह्यात जिल्हा परिषद, सहा नगरपरिषदा, इचलकरंजी नगरपालिका, ग्रामपंचायती, महापालिका स्थायी सभापती भाजपने खेचून आणल्या आहेत. जिल्ह्यात कॉँग्रेसचा एकही आमदार नाही. सतेज पाटलांनी महापालिकेत हिम्मत होती तर नगरसेवकांना खुले सोडायला हवे होते, नाहीतर आम्हीच आघाडीवर होतो, असा टोला लगावला.सुरेश हाळवणकर महाराष्टÑ शासन व केंद्र शासन योजनांचा आढावा घेताना म्हणाले, हजारो शेतकऱ्यांना शासनाची कर्जमाफी दिली. विविध योजनांच्या माध्यमातून हजारो लाभार्थ्यांनी लाभ घेतला. अशा मतदारांनी मतदान केल्यास हातकणंगले विधानसभा मतदारसंघात मोठ्या फरकाने विजयी होऊ, असा विश्वास व्यक्त केला. यावेळी जिल्हाध्यक्ष हिंदुराव शेळके, संघटनमंत्री बाबा देसाई यांनी मार्गदर्शन केले.स्वागत भाजप सरचिटणीस तानाजी ढाले, प्रास्ताविक पी. डी. पाटील यांनी केले. नानासाहेब जाधव यांनी आभार मानले. यावेळी प्रमुख उपस्थितीत सुदर्शन खाडे, आण्णासाहेब शेंदुरे, अंजना श्ािंदे, सयाजी पाटील, उत्तम पाटील, अमित कांबळे, देवानंद कांबळे, प्रज्योत शहा, धनंजय गोंदकर, ग्रा. पं. सदस्य सोनाली जाधव यांच्यासह भाजप तालुका बूथप्रमुख, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.व्यासपीठावर वडगाव नगराध्यक्षांची उपस्थितीवडगावचे लोकनियुक्त नगराध्यक्ष मोहनलाल माळी यांनी अचानक व्यासपीठावर प्रवेश करताच काहींच्या भुवया उंचावल्या. यावेळी आमदार हाळवणकर म्हणाले, वडगावचे नगराध्यक्ष माळी व भाजपचे डॉ. अशोक चौगुले पूर्वी एकमेकांच्या विरोधात लढले. मात्र, आज माळी यांच्या येण्याने हातकणंगले विधानसभा मतदारसंघातील भाजपचा विजय निश्चित झाला आहे. माळी यांना राज्यपातळीवरील ओबीसीचे पद आम्ही देणार असल्याचे त्यांनी सांगितले.