शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

‘दो हंसो का जोडा बिछड गया’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2018 00:36 IST

कोल्हापूर : हिंदकेसरी गणपतराव आंदळकर यांचे जेवढे मल्लविद्येवर प्रेम होते, तितकेच प्रेम त्यांच्या पत्नी सुमित्रा अर्थात माई यांच्यावरही होते. या दोघांचे बंध ५१ वर्षांपूर्वीचे. मार्इंचे भाऊ किशोर हे हिंदकेसरींच्याकडे मोतीबाग तालीम येथे कुस्तीचे धडे गिरवण्यासाठी जात होते त्यातूनच मार्इंची व वस्तादांची ओळख झाली. ओळखीचे प्रेमात अन् सरतेशेवटी लग्नात रूपांतर झाले. ...

कोल्हापूर : हिंदकेसरी गणपतराव आंदळकर यांचे जेवढे मल्लविद्येवर प्रेम होते, तितकेच प्रेम त्यांच्या पत्नी सुमित्रा अर्थात माई यांच्यावरही होते. या दोघांचे बंध ५१ वर्षांपूर्वीचे. मार्इंचे भाऊ किशोर हे हिंदकेसरींच्याकडे मोतीबाग तालीम येथे कुस्तीचे धडे गिरवण्यासाठी जात होते त्यातूनच मार्इंची व वस्तादांची ओळख झाली. ओळखीचे प्रेमात अन् सरतेशेवटी लग्नात रूपांतर झाले. ५१ वर्षांच्या संसारानंतर रविवारी रात्री ज्या हृदयात त्यांनी मार्इंना बसविले होते, तेच बंद पडल्याने मार्इंचा आधार निघून गेला.माई उच्चशिक्षित, तर हिंदकेसरी अक्षरशत्रू होते. सुरुवातीच्या काळात अनेक अडचणींना या दोघांना सामोरे जावे लागले. कोल्हापुरातील भेंडी गल्ली येथे मार्इंचे राहते घर होते. वडील मुंबई येथे रेल्वेत नोकरीस असल्याने त्याही तेथे खासगी कंपनीत नोकरी करीत होत्या. सुटी मिळेल त्याप्रमाणे त्या कोल्हापुरात येत असत. त्यात भाऊ किशोर हे हिंदकेसरी गणपतराव यांच्या मोतीबाग तालमीमध्ये कुस्तीचे धडे गिरवत होते. किशोरसोबत त्यांनी मार्इंना चार-पाचवेळा पाहिले.तेव्हापासून ते मार्इंच्या प्रेमात पडले. भाऊ किशोरही वस्तादांबद्दल खूप काही चांगले सांगत. कालांतराने ओळख वाढली आणि त्यांच्या प्रेमाची चर्चा मोतीबाग तालमीतही पोहोचली. एकेदिवशी किशोरकडूनच मार्इंना लग्नाबाबत मागणी घातली; मात्र त्यास नकार देत किशोर यांनाच त्यांनी फटकारले. त्यात मार्इंची अट होती मुंबईतीलच नवरा करणार. दरम्यानच्या काळात हिंदकेसरींचा कुस्तीतील डंका देशभरात गाजू लागल्याने मार्इंची ही अट मागे पडली आणि त्याचे रूपांतर प्रेमात झाले. दोघांच्या घरच्यांचा त्यांच्या लग्नाला प्रथम विरोध होता.हिंदकेसरींनी त्यांची समजूत काढत दोन्ही कुटुंबांना राजी केले. त्यात मार्इंच्या नातेवाइकांनीही सखोल चौकशी करीत, अखेर लग्नाला होकार दिला. ३ जून १९६७ साली केशवराव भोसले नाट्यगृहात मोठ्या थाटामाटात त्यांचा विवाह झाला अन् नलिनी ऊर्फ सुमित्रा राऊतांच्या आंदळकर झाल्या. ५१ वर्षांच्या संसारात अनेक वादळे आली, त्याचा सामना दोघांनीही मिळून केला. वस्तादांच्या अनेक अडचणींमध्ये त्या ढाल बनून राहिल्या.मंगळवार पेठेतील कोळेकर तिकटी परिसरात ते भाड्याने राहू लागले. तेथून नव्वदीच्या काळात न्यू पॅलेस परिसरात त्यांनी स्वमालकीचे घर बांधले. यथावकाश ५१ वर्षांच्या संसारातून ही ‘दो हंसो की जोडी’ फुटली आणि रविवारी सायंकाळी त्यातील एक हंस अर्थात हिंदकेसरी गणपतराव आंदळकर काळाच्या पडद्याआड गेले.