शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

सागरच्या कुटुंबीयांसाठी दोन लाख

By admin | Updated: March 14, 2017 01:10 IST

मदतीचा ओघ सुरु : पत्नीला शासकीय नोकरीत घेण्यासाठीही हालचाली

कोल्हापूर : राजर्षी शाहू महाराजांची भूमिका साकारताना रंगमंचावरच निधन झालेला अभिनेता सागर चौगुलेंच्या कुटुंबीयांसाठी रविवारी दोन लाखांचा निधी जाहीर करण्यात आला. दुसरीकडे सागरची पत्नी वनिता यांच्या नोकरीसाठी प्रक्रिया सुरूकरण्यात आली आहे. पुण्यात राज्य नाट्य स्पर्धेत अग्निदिव्य नाटक सादर करीत असताना रंगमंचावरच सागरचा मृत्यू झाला होता. शनिवारी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सागरची पत्नी वनिता यांना शासकीय नोकरीत रुजू करण्याचे तसेच त्यांच्या मुलीच्या नावे पाच लाखांच्या रकमेची ठेव ठेवण्याचे आश्वासन दिले होते. रविवारी स्थानिक आमदारांनीही सागरच्या कुटुंबीयांची भेट घेतली व फौंडेशनच्यावतीने दोन लाख रुपयांचा निधी जाहीर केला. यावेळी हृदयस्पर्श व्यासपीठचे अग्निदिव्य नाटकाचे निर्माते पद्माकर कापसे, पद्मिनी कापसे, प्र्रिया मेंच, श्रीकांत जाधव, विनायक भोसले, जयदीप मोहिते, राज शेख, विजय पत्रावळे सुरेंद्र अहिर, नितीन शेळके शिवसेनेचे किशोर घाटगे, दीपक गौड, मंदार तपकिरे उपस्थित होते.वनिता चौगुले यांचे बी.कॉम.पर्यंतचे शिक्षण पूर्ण झाले आहे. त्यांचा बायोडाटा व शैक्षणिक कागदपत्रे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या कार्यालयात सादर करण्यात आली आहेत. येथे जमा करा रक्कम सागरच्या कुटुंबीयांना १२ दिवसांच्या आत भरीव निधी देण्याचा निर्धार कोल्हापुरातील रंगकर्मी व संस्थांनी केला आहे. त्यासाठी प्रत्येक ग्रुपमधील सदस्यांच्यावतीने निधी संकलनाचे काम सुरूआहे. पुढील दोन-तीन दिवसांत सर्व संस्थांच्यावतीने जमा झालेली रक्कम सागरच्या पत्नीकडे सुपूर्त करण्यात येणार आहे. ज्यांना आपल्यावतीने आर्थिक मदत करायची आहे त्यांनी वनिता सागर चौगुले, आयडीबीआय बँक, खाते नं ०६१५१०४००००९०८९०, आयएफएसडी कोड नं आयबीकेएल ००००६१५, राजारामपुरी शाखा, कोल्हापूर या बँक खात्यावर ही रक्कम जमा करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. शासकीय नोकरीबाबत अडचणएखाद्या व्यक्तीला शासकीय नोकरी मिळण्यासाठी विशिष्ट प्रक्रिया असते. शासनाकडून रिक्त पदांची जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर इच्छुक उमेदवारांना अर्ज भरावा लागतो, त्यांची लेखी परीक्षा होते, मुलाखत घेतली जाते. त्यानंतर मेरीट लिस्टप्रमाणे रिक्त पदे भरली जातात. शासकीय नोकरीत असलेल्या एखाद्या व्यक्तीचे निधन झाले तर त्याच्या वारसांना अनुकंपा अंतर्गत नोकरीत रुजू करता येते. मात्र, हे अनुकंपा भरतीचे हजारो अर्ज शासन दरबारी पडून आहेत. सागर चौगुले शासकीय नोकरीत नव्हते त्यामुळे त्यांची पत्नी वनिता यांना अनुकंपा तत्त्वावर नोकरीत घेता येणार नाही. त्यामुळे त्यांना शासकीय नोकरी द्यायची असेल तर शासकीय नियमांनुसारच जावे लागेल, अन्यथा खासगी संस्थांमध्ये नोकरी देता येईल. या अडचणीवर आता चंद्रकांतदादा कसा मार्ग काढतात, हे पाहावे लागेल.