शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

तनिष्क ज्वेलर्समध्ये महिला चोरट्यांकडून पावणेदोन लाखांचे दागिने हाताेहात लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:20 IST

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, मंगळवारी दुपारी तीन महिला असेंब्ली रोडवर एका रिक्षात बसून दसरा चौकातील एम्पायर टॉवरनजीक त्या ...

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, मंगळवारी दुपारी तीन महिला असेंब्ली रोडवर एका रिक्षात बसून दसरा चौकातील एम्पायर टॉवरनजीक त्या महिला उतरल्या. तेथून त्या तनिष्क ज्वेलर्समध्ये दागिने खरेदी करण्याच्या बहाण्याने गेल्या. तिघींनी काउंटरवरील सेल्समनला बोलण्यात गुंतवले. काही दागिने पसंत नसल्याचे सांगून नवनवीन दागिने दाखविण्यासाठी सेल्समनला भाग पाडले. त्यावेळी वेगळ्या डिझाईनचे दागिने आणण्यासाठी सेल्समन काउंटरवरून उठून शेजारच्या काउंटरवर गेला असता अवघ्या काही क्षणातच त्यापैकी एका महिलेने नजर चुकवून काउंटरवरील सोन्याच्या बांगड्यांची एक जोडी (दोन बांगड्या) अलगद उचलून दुसऱ्या महिलेच्या हातात दिल्या. तिने त्या आपल्या पर्समध्ये लपवून ठेवल्या. अवघ्या १२ मिनिटांत हा डाव आटोपता घेऊन त्या तिघीही महिला तेथून निघून गेल्या.

दरम्यान, ग्राहकाला दागिने दाखवून झाल्यानंतर ते पुन्हा ठेवताना सोन्याच्या बांगड्यांचे एक जोड कमी असल्याचे सेल्समनच्या लक्षात आले. त्यानंतर सेल्समनने ही बाब मालकाच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर रात्री उशिरा ३७ ग्रॅम ७०० मिली वजनाच्या सोन्याच्या बांगड्या चोरीला गेल्याची तक्रार सेल्समन सतीश विलास यादव (रा. प्रयाग चिखली, ता. करवीर) यांनी लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात दिली.

चोरीची माहिती मिळताच लक्ष्मीपुरी पोलिसांच्या पथकाने मध्यवर्ती बसस्थानक परिसरात जाऊन संशयित महिलांच्या शोधासाठी मोहीम राबवली.

सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चोरीचा प्रकार कैद

तीन महिला काउंटरवरून सोन्याचे दागिने सेल्समनची नजर चुकवून कशा पद्धतीने चोरत होत्या याचे चित्रण तनिष्क ज्वेसर्सच्या शोरूममधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे, त्यानुसार पोलीस संशयित महिलांचा तपास करत आहेत.

फोटो नं. ०५०१२०२१-कोल-चोरी०१,०२,०३

ओळ : कोल्हापुरात दसरा चौकातील तनिष्क ज्वेलर्समध्ये मंगळवारी दुपारी ग्राहक बनून आलेल्या तीन महिला चोरट्यांनी सोन्याच्या दोन बांगड्या हाताेहात लंपास केल्या.

फोटो नं. ०५०१२०२१-कोल-चोरी०४

ओळ : ग्राहक बनून आलेल्या तीन महिलांपैकी एक महिला चोर.