शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
5
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
8
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
9
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
10
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
11
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
12
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
13
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
14
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
15
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
16
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
17
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
18
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
19
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
20
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

गोवा बनावटीची दोन लाख ३२ हजारांची दारू जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 04:25 IST

कोल्हापूर : विनापरवाना बेकायदा गोवा बनावटीचे विदेशी दारूचे बॉक्स भरून कोल्हापुरात आलेला टेम्पो स्थानिक गुन्हा अन्वेषणच्या पोलीस पथकाने पकडला. ...

कोल्हापूर : विनापरवाना बेकायदा गोवा बनावटीचे विदेशी दारूचे बॉक्स भरून कोल्हापुरात आलेला टेम्पो स्थानिक गुन्हा अन्वेषणच्या पोलीस पथकाने पकडला. यामधील सुमारे दोन लाख ३२ हजार रुपये किमतीची विदेशी दारू व आलिशान चारचाकी वाहन असा सुमारे तीन लाख ८२ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी विजयकुमार विलास बनसोडे (वय २९, रा. मिठारी मळा, बोंद्रेनगर, कोल्हापूर) याला अटक केली. ही कारवाई बुधवारी पहाटेच्या सुमारास कोल्हापूर ते राधानगरी रोडवर हळदी फाटा येथे केली.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, जिल्ह्यातील अवैध व्यवसायावर कारवाईचे आदेश पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी दिले. त्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक तानाजी सावंत यांनी अवैध धंद्यावरील कारवाईसाठी विविध पथके तयार केली. कोल्हापूर ते राधानगरी मार्गावरून हळदी मार्गे एक चारचाकी वाहन मध्यरात्रीच्या सुमारास विनापरवाना बेकायदा गोवा बनावटीचे विदेशी दारूचे बॉक्स घेऊन येणार असल्याची माहिती पोलीस अंमलदार विजय कारंडे यांना मिळाली. वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार पोलिसांनी सापळा रचून हळदी फाटा येथे हे चारचाकी वाहन पकडले. त्यामधून दोन लाख ३२ हजार रुपये किमतीचे दारूचे बॉक्स जप्त केले. दारू व वाहन असा सुमारे तीन लाख ८२ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. चालक विजयकुमार बनसोडे याला अटक केली. त्याच्यावर करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.

ही कारवाई पो. नि. तानाजी सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विनायक सपाटे, विजय कारंडे, सचिन देसाई, संतोष पाटील, कुमार पोतदार, किरण गावडे, राजेंद्र वरंडेकर यांनी केली.

फोटो नं, ०५०५२०२१-कोल-पोलीस०१

ओळ : स्थानिक गुन्हे अन्वेषण पोलीस पथकाने हळदी फाटा (ता. करवीर) येथे बुधवारी पहाटेच्या सुमारास सापळा रचून बेकायदा गोवा बनावटी विदेशी दारूचे बॉक्स वाहतूक करताना पकडले.

फोटो नं, ०५०५२०२१-कोल-विजयकुमार बनसोडे (आरोपी)

===Photopath===

050521\05kol_9_05052021_5.jpg

===Caption===

फोटो नं, ०५०५२०२१-कोल-पोलीस०१ओळ : स्थानिक गुन्हे अन्वेषण पोलीस पथकाने हळदी फाटा (ता. करवीर) येथे बुधवारी पहाटेच्या सुमारास सापळा रचून बेकायदा गोवा बनावटी विदेशी दारुचे बॉक्स वाहतुक करताना पकडले.फोटो नं, ०५०५२०२१-कोल-विजयकुमार बनसोडे(आरोपी)