शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
2
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
5
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
6
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
7
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
8
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
9
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
10
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
11
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
12
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
13
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
14
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
15
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
16
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
17
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
18
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
19
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं

आंब्याजवळ अपघातात दोघे ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2018 01:02 IST

आंबा : विशाळगडला देवदर्शनास जात असताना आंब्याजवळील केर्ले गावच्या अपघाती वळणावर मोटारसायकल व डंपर यांच्यात समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दोघे मोटारसायकलस्वार जागीच ठार झाले. बबलू जेम्स डेव्हीड (वय २८, रा. जयसिंगपूर, २री गल्ली) व संग्राम अर्जुन चव्हाण (२५, रा. कोंडिग्रे) अशी ठार झालेल्यांची नावे आहेत. सायंकाळी पावणेसहा वाजता हा ...

आंबा : विशाळगडला देवदर्शनास जात असताना आंब्याजवळील केर्ले गावच्या अपघाती वळणावर मोटारसायकल व डंपर यांच्यात समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दोघे मोटारसायकलस्वार जागीच ठार झाले. बबलू जेम्स डेव्हीड (वय २८, रा. जयसिंगपूर, २री गल्ली) व संग्राम अर्जुन चव्हाण (२५, रा. कोंडिग्रे) अशी ठार झालेल्यांची नावे आहेत. सायंकाळी पावणेसहा वाजता हा अपघात झाला. अपघाताची शाहूवाडी पोलिसांत नोंद झाली. १०८ सेवा गाडी तातडीने घटनास्थळी दाखल झाली, पण मृतदेह नेण्याची परवानगी नसल्याने मृतदेह रस्त्यावर पडून होते. पोलीस साडेसातला घटनास्थळी दाखल झाले.घटनास्थळ व पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी : बबलू डेव्हीड हा लक्ष्मी क्रेन कंपनीत चालक म्हणून नोकरीस होता. त्याच्यासोबत संग्राम कामास होता. रविवारची सुट्टी असल्याने डेव्हीड अन्य चार मित्रांसह तीन मोटारसायकली घेऊन बारा वाजता जयसिंगपूरहून विशाळगडकडे निघाले. वाटेत जेवण करून मलकापूरमध्ये डेव्हीडने आपली गाडी महेश हिरेमठ या मित्राला दिली. त्याची पल्सर (एम एच ०९ डी व्ही ८३६९) स्वत: घेऊन ते विशाळगडकडे पुढे निघाले. वाटेत केर्ले गावाच्या अपघाती वळणावर समोरून आलेल्या डंपरवर (एम एच १० ए डब्लू ७८३०) धडकले. ही धडक एवढी जोरदार होती की मोटारसायकलच्या हेडलाईटचे कव्हर डंपरच्या बंपरमध्ये घुसले. डंपरने मोटारसायकलला सुमारे तीस फूट पुढे फरफटत नेले. यामध्ये मोटारसायकलचा पुढील भाग निकामी झाला. दोघांच्या डोक्याला मार बसून मोठा रक्तस्राव झाला. डेव्हीडचे मित्र मागोमाग येत होते. वाटेत मित्रांचे मृतदेह बघून चारही मित्रांची बोबडीच वळली. काय करायचे त्यांना सुचेना. स्थानिकांनी त्यांना धीर देऊन घरी कळवण्याचे सुचवले. मृत दोघेही अविवाहित असून, डेव्हीडला दोन भाऊ, आई-वडील आहेत. सोबत डेव्हीडचे चार मित्र होते, पण संग्रामची त्यांना ओळख नव्हती. त्यामुळे अपघातानंतर दोन तास त्याचा पूर्ण पत्ता समजेना. पोलीस आल्यानंतर खिशातील आधारकार्डवरून त्याची ओळख पटली. त्यानंतर त्यांच्या घरी कळवण्यात आले. डंपरचालक डंपर सोडून पसार झाला होता. मृतदेह नेणारी स्वतंत्र यंत्रणा नसल्याने डंपरमध्येच मृतदेह टाकून पोलिसांनी मलकापूर ग्रामीण रुग्णालयात नेले.अपघाती वळणावर फलकांची गरजगणेश जयंतीनिमित्त मानोली, मलकापूर व कोकण भागात महामार्गावर मोठी वर्दळ होती.वळणावरच डंपर व मृतदेह पडल्याने वाहनांना कसरत करून पुढे जावे लागत होते. बघ्यांची गर्दी, त्यात धोक्याचेवळण पाहून येथील अपघात मदत पथकाचे कार्यकर्ते प्रमोद माळी, कृष्णा दळवी, गणेश पाटील, बापूजाधव व पोलीसपाटील यांनी मार्गावर थांबून पोलिसांच्या गैरहजेरीत वाहतूक नियंत्रित करून वाहकांना मदत केली. केर्ले येथील पुलावरील हेवळण अपघाताचे केंद्र बनले आहे. येथे पांढरे पट्टेव सूचना फलकाची गरज आहे.