शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

नवे पारगावचे दोघे जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2021 04:46 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : वाठार रस्त्यावर भरधाव दुचाकी घसरून झालेल्या अपघातात दोघे युवक जखमी झाले. ऋतुराज सुभाष धुमाळ ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : वाठार रस्त्यावर भरधाव दुचाकी घसरून झालेल्या अपघातात दोघे युवक जखमी झाले. ऋतुराज सुभाष धुमाळ (वय २२) आणि सागर हणमंत तळेकर (२८, दोघे रा. नवे पारगाव, ता. हातकणंगले) अशी त्यांची नावे आहेत. त्यांना तातडीने उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल केले.

ऊसतोड मजूर जखमी

कोल्हापूर : रूकडी फाटा येथे झालेल्या अपघातात ऊसतोड मजूर जखमी झाला. आकाश बंडू शेरकर (वय २१, सध्या रा. जवाहर साखर कारखाना परिसर) असे त्याचे नाव आहे. त्याला सीपीआरमध्ये उपचारासाठी दाखल केले. आपघाताची नोंद सीपीआर चौकीत झाली आहे.

कोलोली येथे मारामारीत एक जखमी

कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील कोलोली येथे शुक्रवारी रात्री झालेल्या मारहाणीत एकजण जखमी झाला. अंकुश हणमंत पाटील (वय ४५, रा. कोलोली, पन्हाळा) असे जखमीचे नाव आहे. त्यांना सीपीआरमध्ये दाखल केले. याची नोंद सीपीआर पोलीस चौकीत झाली.

दुचाकीस्वार जखमी

कोल्हापूर : शहरानजीक शिंगणापूर पाण्याची टाकी परिसरात भरधाव दुचाकी घसरून झालेल्या अपघातात तरुण जखमी झाला. विजय रंगराव पाटील (वय ३०, रा. शिंगणापूर) असे त्याचे नाव आहे. त्याला सीपीआर रुग्णालयात दाखल केले. याची नोंद सीपीआर पोलीस चौकीत झाली आहे.