शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

दुचाकी दुभाजकाला धडकून दोन मित्र ठार

By admin | Updated: March 27, 2016 01:17 IST

कावळा नाक्याजवळ घटना : दोघेही महाविद्यालयीन विद्यार्थी

कोल्हापूर : भरधाव मोटारसायकल मेरी वॉनलेस रुग्णालयासमोरील दुभाजकाला धडकून गंभीर जखमी झालेल्या दोघा मित्रांचा सीपीआर रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. विशाल मोहन रोहिडा (वय २०, रा. रुईकर कॉलनी), आदित्य हरीश चंदवाणी (१९, रा. हरी निवास, सुर्वेनगर- ताराबाई पार्क) अशी त्यांची नावे आहेत. ही घटना शनिवारी पहाटे साडेचारच्या सुमारास घडली. विशाल रोहिडा व आदित्य चंदवाणी हे पुण्याच्या मित्राला सोडण्यासाठी शुक्रवारी (दि. २५) रात्री अकराच्या सुमारास मध्यवर्ती बसस्थानकावर आले होते. मित्राला खासगी ट्रॅव्हल्सच्या बसमध्ये बसवून ते मोटारसायकलवरून गांधीनगर येथील मित्राला भेटण्यासाठी गेले. तेथून ते मध्यरात्री पुन्हा मध्यवर्ती बसस्थानकावर आले. याठिकाणी त्यांनी नाष्टा व कॉफी घेतली. त्यानंतर आदित्यला घरी सोडण्यासाठी ते कावळा नाक्याच्या दिशेने भरधाव निघाले. मेरी वॉनलेस रुग्णालयासमोर येताच विशालचा मोटारसायकलवरील ताबा सुटून ती रस्ता दुभाजकाला धडकली. त्यात दोघेही डोक्याला गंभीर दुखापत होऊन बेशुद्ध पडले. ताराराणी अग्निशामक दलाच्या जवानांनी त्यांना ‘सीपीआर’मध्ये दाखल केले. तेथे उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्याजवळील ओळखपत्रांवरून त्यांची ओळख पटली. शाहूपुरीचे पोलिस हवालदार रवी पाटील यांनी घटनास्थळाचा पंचनामा करून नातेवाइकांना ‘सीपीआर’मध्ये बोलावून घेतले. आदित्य हा बंगलोर येथे हॉटेल मॅनेजमेंटचे, तर विशाल हा भारती विद्यापीठात शिक्षण घेत होता. या दोघांच्या मृतदेहांवर पंचगंगा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. या अपघाताची नोंद शाहूपुरी पोलिस ठाण्यात झाली. बहिणीपाठोपाठ भावाचाही अपघाती मृत्यू आदित्यची थोरली बहीण श्रुतिका चंदवाणी ही पुण्यामध्ये जाहिरात एजन्सीमध्ये काम करीत होती. मित्रांसोबत कोल्हापूरला येताना पुण्याजवळील नीरा नदीपात्रात कार कोसळून २०१३ मध्ये तिचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या दु:खातून सावरण्याआधीच चंदवाणी कुटुंबियांवर आदित्यच्या अपघाती मृत्यूचा आघात झाला. कुटुंबीयांचा आक्रोश हृदय हेलावणारा होता. त्याचे वडील हरीश, आई प्रमिला यांची केविलवाणी अवस्था पाहून नातेवाइकांचेही डोळे भरून आले. (प्रतिनिधी)