शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

टिचभर बांधासाठी दोन कुटुंबे उद्‌ध्वस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 04:29 IST

कोपार्डे : आडूर (ता. करवीर) येथे टिचभर बांधाच्या हद्दीवरून दोन सख्ख्या भावांत वाद झाला आणि या किरकोळ वादातून एकचा ...

कोपार्डे : आडूर (ता. करवीर) येथे टिचभर बांधाच्या हद्दीवरून दोन सख्ख्या भावांत वाद झाला आणि या किरकोळ वादातून एकचा जीव गेला आणि दुसरा भाऊ व त्याचा मुलगा पोलिसांच्या ताब्यात गेल्याने दोन्ही कुटुंबे आर्थिक व मानसिकदृष्ट्या उद्‌ध्वस्त झाली आहेत.

आडूर येथे पाच भावांचे भोसले कुटुंब आहे. त्यांची एकत्र शेती विभक्त कुटुंब झाल्यानंतर वाटणी करण्यात आली. बांधाच्या हद्दीवरून यशवंत व विलास या दोन भावांत गेले दोन महिने धुसफूस होती. यशवंतचा मुलगा सागरने चुलता विलास याची आदल्यादिवशी समजूत काढली होती. हा वाद कायमचा मिटावा म्हणून नातेवाईक बाजीराव सूर्यवंशी व बाळासाहेब हावलदार हे नातेवाईक शुक्रवारी आले. हद्दीवर सिमेंटचे नंबर टाकताना मागील हेवेदावे उफाळून आले. नातेवाईकांनी समजूत काढलीही आणि ते दुसऱ्या बाजूला बांधाची हद्द पाहायला गेले. एवढ्यात विलासचा मुलगा तेथे आला आणि क्षणात होत्याचे नव्हते झाले. किरकोळ वादातून एका भावाचा जीव गेला तर दुसरा भाऊ व पुतण्या पोलीस कोठडीत गेले.

भोसले कुटुंब पाचही भाऊ अत्यंत मितभाषी. ज्याचा वाद झाला त्यातील विलास हा कुंभी कासारी कारखान्यात नोकरीला आहे. याला दोन मुले यातील एकाचा सहा महिन्यांपूर्वी अपघाती मृत्यू झाला आहे. दुसरा अतुल महाविद्यालयात शिक्षण घेत आहे तर मृत यशवंत घरची शेती सांभाळत पंक्चरचे दुकान चालवत होता. सगळे व्यवस्थित सुरू होते पण टिचभर बांधासाठी वादात एका भावाचा जीव गेला व दुसरा पोलिसांच्या संशयाच्या जाळ्यात अडकला आणि दोन्ही कुटुंबे उद्‌ध्वस्त झाली आहेत.