शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मोटार अपघातात गोव्याचे दोन ठार, तीन गंभीर

By admin | Updated: June 5, 2014 01:34 IST

निपाणीजवळ दुर्घटना : स्विफ्टची ट्रकला धडक

निपाणी : गोव्याहून शिर्डीला साईबाबांच्या दर्शनासाठी जाणार्‍या साईभक्तांच्या स्विफ्टकारने ट्रकला धडक दिल्याने झालेल्या अपघातात कारमधील दोनजण ठार, तर तीनजण गंभीर जखमी झाले. पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील निपाणी अक्षयनगर क्रॉसवर आज, बुधवारी पहाटे तीन वाजता हा अपघात झाला. संदेश मुळगावकर (वय २७, रा. गोवा) याचा जागीच मृत्यू झाला. तर चालक रोहण ºहाटवळ (३४, रा. गोवा) याचा कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयात उपचार चालू असताना मृत्यू झाला. केजपॉल फर्नांडिस, गोपाळ बोचडी आणि अशोक बांदेकर (सर्व रा. गोवा) अशी गंभीर जखमींची नावे आहेत. त्यांच्यावर सीपीआर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गोव्यातील हे मित्र सर्वजण स्विफ्टकारने (जीए ०३ पी ९९९१) शिर्डी येथील साईबाबांच्या दर्शनासाठी जात होते. निपाणी येथे आल्यानंतर आश्रयनगर क्रॉसवर आंध्र प्रदेशहून नागरपूरकडे जाणार्‍या ट्रकला (एपी ०२ टीए ६४८८) कारने जोराची धडक दिली. या अपघातात कारच्या पुढील भागाचा चक्काचूर झाला. यावेळी पुढे बसलेला संदेश मुळगावकर यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. तर चालक रोहण याचा उपचार सुरू असताना रुग्णालयात मृत्यू झाला. अपघातग्रस्त कारमध्ये रक्ताचा सडा पडला होता. अपघाताची माहिती मिळताच फौजदार धिरज शिंदे, हवालदार आनंद पांडव, एस. एस. चिकोडे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. या अपघातप्रकरणी ट्रकचालक बाबू (रा. आंध्र प्रदेश) याला पोलिसांनी अटक केली आहे. आज सकाळी शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले. निपाणी शहर पोलीस ठाण्यात या अपघाताची नोंद झाली आहे. (प्रतिनिधी)