शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
3
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
4
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
5
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
6
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
7
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
9
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
10
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
11
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
12
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
13
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
14
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
15
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
16
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
17
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
18
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
19
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
20
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
Daily Top 2Weekly Top 5

पुत्रप्रेमापोटी बनवली चक्क दुचाकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2018 00:41 IST

सचिन भोसले ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : करवीरकरांच्या हौसेचे मोल नाही, असे महाराष्ट्रात नव्हे तर जगभरात म्हटले जाते. त्यात वाहनप्रेम तर सर्वश्रुत आहे. कोळेकर तिकटी येथील व्यवसायाने दुचाकी मेकॅनिक असलेल्या नीलेश कोंडेकर यांनी आपला सहा वर्षाचा मुलगा श्रेयसवरील प्रेम व त्याच्या हट्टापोटी चक्क मोटारसायकल तयार केली आहे.करवीरकरांचे गाड्यांवरील प्रेम जगभरात प्रसिद्ध ...

सचिन भोसले ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : करवीरकरांच्या हौसेचे मोल नाही, असे महाराष्ट्रात नव्हे तर जगभरात म्हटले जाते. त्यात वाहनप्रेम तर सर्वश्रुत आहे. कोळेकर तिकटी येथील व्यवसायाने दुचाकी मेकॅनिक असलेल्या नीलेश कोंडेकर यांनी आपला सहा वर्षाचा मुलगा श्रेयसवरील प्रेम व त्याच्या हट्टापोटी चक्क मोटारसायकल तयार केली आहे.करवीरकरांचे गाड्यांवरील प्रेम जगभरात प्रसिद्ध आहे. त्यात गाडी कुठल्याही मेड अर्थात बनावटीची असो ती दुरुस्तीसाठी अवघड काम असेल तरीही ते शक्य करून दाखविणे हे येथील मेकॅनिकांचे विशेष कौशल्य आहे.यासह मुलांवरील प्रेमापोटी किंवा गाडी शौकिनांपोटी गाडी कोटीची असो वा लाखाची ती दारात हवीच. मग त्यासाठी कितीही मोजावे लागले तरी चालतील, असा भाव केवळ येथेच पाहण्यास मिळतो. यासह परदेशी बनावटीप्रमाणे देशी गाडीही जशीच्या तशी बनवून दाखविणेही येथेच पाहण्यास मिळते म्हणून या नगरीतच जगविख्यात मर्सिडीज, रोव्हर अशा गाड्यांचे स्पेअर पार्टस् तयार केले जातात. अशाच नगरीत अनेक मेकॅनिक असे आहेत की त्यांना एखाद्या गाडीचे इंजिन, पार्ट दाखविला की त्याप्रमाणे ते बनविण्याचे कौशल्य त्यांच्यात आहे.अशाच मातीतून तयार झालेल्या कोळेकेर तिकटी येथील नीलेश कोंडेकर या दुचाकी दुरुस्ती करणाऱ्या मेकॅनिकने त्याचा सहा वर्षाचा मुलगा श्रेयस याच्यावरील प्रेमापोटी गेल्या पंधरा दिवसांच्या कालावधीत तीन फूट लांबीची व ४८ सीसी क्षमतेची दुचाकी बनवली आहे. यासाठी त्याला १० हजार रुपये खर्च आला आहे. ही मोटारसायकल रस्त्यावर फिरविण्यासाठी तयार केली नसून केवळ मैदानातच फेरफटका मारता यावा याकरिता गतीही कमी केली आहे.मोटारसायकलसाठी एक फुटाचे टायर, डिस्क ब्रेक, विशिष्ट चॅसी, चेनड्राईव्ह, क्लच वेट, हे सर्व अल्टरनेट केले आहेत. अ‍ॅक्सिलेटरही विशिष्ट प्रकारचा केला आहे. त्यामुळे गतीही मर्यादितच राहणार आहे. इंजिनही हॉक्सा अर्थात लाकूड कापायचे मशीन अल्टरनेट केले असून ते पेट्रोल टू स्ट्रोक आहे. संपूर्ण मोटारसायकलसाठी दहा हजार इतका खर्च आला आहे.मुलगा श्रेयसने सायकल पाहिजे म्हणून हट्ट धरला होता. मग मी त्याला मोटारसायकल तयार करून देतो, असे बोळवण करण्यासाठी सांगितले होते; पण त्याने हट्टच धरला. मग मी अशा प्रकारची मोटारसायकल तयार केली. लहानपणापासूनच वाहतूक सुरक्षिततेचेही धडे मला त्याला देता येतील, या उद्देशाने ही मोटारसायकल बनविली आहे.- नीलेश कोंडेकर, दुचाकी मॅकेनिक