शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

सोळापेक्षा जास्त उमेदवार असल्यास दोन मतपत्रिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2019 01:04 IST

प्रवीण देसाई । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीसाठी एका मतदारसंघात सोळापेक्षा जादा उमेदवार रिंगणात राहिल्यास मतदान केंद्रामध्ये ...

प्रवीण देसाई ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : लोकसभा निवडणुकीसाठी एका मतदारसंघात सोळापेक्षा जादा उमेदवार रिंगणात राहिल्यास मतदान केंद्रामध्ये दोन मतपत्रिका ठेवाव्या लागणारआहेत. ‘कोल्हापूर’मधून २२ व ‘हातकणंगले’मधून २० उमेदवारांचे अर्ज आहेत. यातील किती उमेदवार माघार घेतात याकडे निवडणूक विभागाच्याही नजरा लागून राहिल्या आहेत; कारण माघारीनंतरही सोळापेक्षा जास्त उमेदवार रिंगणात राहिल्यास दोन मतपत्रिका कराव्या लागणार आहेत. त्यानुसार निवडणूक विभागाने तयारी सुरू केली आहे.कोल्हापूर व हातकणंगले मतदारसंघांतून मोठ्या संख्येने अर्ज दाखल झाले आहेत. माघारीनंतर सोळापेक्षा जादा अर्ज राहिल्यास निवडणूक विभागाला (ईव्हीएम) दोन मतपत्रिका कराव्या लागणार आहेत. हे चित्र आज, सोमवारी माघारीनंतर स्पष्ट होणार आहे, असे असले तरी निवडणूक विभागाकडून तयारी सुरू करण्यात आली आहे. माघारीनंतर १६ पेक्षा कमी उमेदवार रिंगणात राहिले, तर एक (ईव्हीएम) मतपत्रिका तयार करावी लागणार आहे. तसे न होता जादा उमेदवार रिंगणात राहिल्यास मतदान केंद्रामध्ये दोन ‘ईव्हीएम’ची बॅलेट युनिट बसवावी लागणार आहेत.कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात २१३२ व हातकणंगले मतदारसंघात १८०७ असे मिळून ३९३९ मतदान केंद्रे आहेत. प्रत्येक केंद्रावर एक मशीन या प्रमाणे ३९३९ ‘ईव्हीएम’ उपलब्ध असून, राखीव कोट्यात जवळपास तीन हजार मशीन ठेवण्यात आल्या आहेत. तरीही सोळापेक्षा जास्त उमेदवार रिंगणात राहिल्यास आणखी काही ‘ईव्हीएम’ची आवश्यकता भासणार आहे; त्यामुळे या मशीन भारत निवडणूक आयोगाकडून मार्गदर्शन घेऊन इतर जिल्ह्यातील घेण्याची तयारी निवडणूक विभागाने ठेवली आहे. माघारीनंतर सोळापेक्षा कमी उमेदवार रिंगणात राहिल्यास एकाच मतपत्रिकेवर (ईव्हीएम)काम भागणार आहे. किती उमेदवार रिंगणात राहतात यावरच पुढील दिशा ठरविली जाणार असल्याचे सूत्राकडून सांगण्यात आले.मतपत्रिकेवर पंधराअधिक एक ‘नोटा’निवडणुकीसाठी एका मतपत्रिकेवर (ईव्हीएम) १५ उमेदवार अधिक एक ‘नोटा’ अशी रचना आहे. जर १६ उमेदवारांपेक्षा अधिक उमेदवार रिंगणात राहिल्यास दुसरी मतपत्रिका तयार करावी लागणार आहे.