इचलकरंजी : येथील कलानगर, जामदार मळा परिसरातील गोडावूनमधून मागील आठवड्यात झालेल्या सुताच्या रिकाम्या कोन चोरीप्रकरणी दोघांना शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून बारा हजार ५०० रुपये किमतीच्या सुताची २४ रिकाम्या कोनची बाचकी (पोती) व चोरीत वापरलेली अडीच लाख रुपयांची कार असा दोन लाख ६२ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.
कृष्णात प्रकाश पोटेकर (वय २३, रा. जामदार मळा) व गौरव दत्तात्रय सूर्यवंशी (२२, रा. बंडगर माळ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी विजयकुमार छोटेलाल गुप्ता यांनी १३ सप्टेंबरला तक्रार दिली होती. त्यामध्ये, ११ सप्टेंबर ते १२ सप्टेंबरच्या रात्री गोडावूनसमोरून २४ सुताच्या रिकाम्या कोनची बाचकी चोरीस गेल्याचे नमूद केले आहे. याबाबत तपास करून दोघांना पोलिसांनी अटक केली.